• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ज्योती क्रांती दरोडा प्रकरणी तीन आरोपी गजाआड

admin by admin
January 4, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवची ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटी : दरोडा पडला की पाडला ?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शहरातील सुनील प्लाझा कॉम्प्लेक्समधील ज्योती क्रांती को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीवर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून ४ किलो सोने लुटणाऱ्या पाच पैकी तीन दरोडेखोरांना पोलिसानी गजाआड केले आहे.

दि.23.12.2023 रोजी 17.38 वा. सु. ज्योती क्रांती को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा धाराशिव मध्ये पाच अनोळखी इसमांनी येवून रिव्हालवर व चाकुचा धाक दाखवून ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मधील रोख रक्कम 1,40,000₹, दोन मोबाईल, 6,000 ₹ व 4 किलो 126 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 1, 85, 68, 000 ₹ असा एकुण 1, 87, 14, 000 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाले. अशी फिर्याद नामे- सतीश अनिरुध्द फुटाणे, वय 37 वर्षे, व्यवसाय- कॅशीअर ज्योती क्रांती कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी शाखा धाराशिव, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.24.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 395 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांच्या निष्क्रिय कारभारामुळे भरदिवसा पडलेल्या दरोड्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी आपली गेलेली अब्रू वाचवत या दरोड्याप्रकरणी तीन आरोपीना अटक केली आहे. त्यात शहरातील विजय चौकमध्ये राहणाऱ्या रमेश बळीराम दीक्षित याचा समावेश असून, तो पवनचक्की वाहनावर चालक आहे. त्यानेच हा संपूर्ण दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. अन्य दोन दरोडेखोरात प्रशांत जालिंदर शिंदे ( रा. नेरुळ, मुंबई ) आणि उदयन बेलाउदयन वल्लिकालाईल ( रा. नेरुळ , मुंबई ) यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी दीक्षित याच्याकडून १ किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे,. सर्व आरोपीना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बँकेचा कर्मचारीच निघाला दरोडेखोर

दरोड्यातील मुख्य आरोपी रमेश बळीराम दीक्षित हा ज्योती क्रांती को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमध्ये तीन वर्षापूर्वी काम करत होता. त्यास बॅंकेची खडा न खडा माहिती आहे. त्यानेच आंतरराज्य गुन्हेगारांशी संधान साधून दरोड्याचा प्लॅन केला होता. या दरोड्यात आणखी काही कर्मचारी गुंतल्याची शक्यता आहे.

सुरक्षा रक्षक का नाही ?

बँकेत चार किलो सोने होते तर सुरक्षा रक्षक का ठेवला नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे सोने नेमके कुणाचे होते ? शहरातील एकानेही अजून माझे सोने बँकेत होते, अशी तक्रार केलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरावर मोर होण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

दीड कोटी नेमके गेले कुणीकडे ?
चोऱ्या, दरोडे आणि गुन्हेगारीचा तपास करण्यासाठी मदत व्हावी म्हणून शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस विभागाला सहा वर्षांपूर्वी दीड कोटी निधी देण्यात आला आहे. पण एकाही चौकात अद्याप सीसीटीव्ही पोलीस विभागाने बसवले नाहीत, नेमका हा निधी गेला कुणीकडे हा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

Previous Post

धाराशिव शहरात दलित तरुणास बेदम मारहाण

Next Post

खरीप २०२२ पीक विम्याची ५० टक्के रक्कम द्या

Next Post
खरीप २०२२ पीक विम्याची ५० टक्के रक्कम द्या

खरीप २०२२ पीक विम्याची ५० टक्के रक्कम द्या

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!