• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीस उच्चाधिकार समितीची मंजुरी

– आ.राणाजगजितसिंह पाटील

admin by admin
January 12, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीस उच्चाधिकार समितीची मंजुरी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव, लोहारा व औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची असणाऱ्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीस राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळाली असून ही योजना पुन:कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षपासून देखभाल दुरुस्ती अभावी बंद असलेली ही योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाची दुरुस्ती आवश्यक होती. या योजनेचे आशिव, कानेगाव, करजखेडा, वडाळा, बामणी असे ५ टप्पे असून यामुळे ६८९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यातील ५७०० क्षेत्र केवळ धाराशिव तालुक्यातील आहे. सदरील योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष दुरस्तीचा रु. ९८.१४ कोटी चा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या मंजुरीने राज्य तांत्रिक ससल्लागार समितीच्या मंजूरी साठी पाठविण्यात आला होता. सदरील समितीच्या काल दि. ११/०१/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये यास मंजूरी देण्यात आली आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उप मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेटून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

योजना कार्यान्वित करण्यासाठी योजेनची संपूर्ण पाहणी करून स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाच्या दुरुस्तीचे अंदाज पत्रक आवश्यक होते. या योजनेच्या स्थापत्य दुरुस्ती साठी रु. ३५.६१ कोटी, विद्युत दुरुस्ती साठी रु. १८.०६ कोटी व यांत्रिकी विभागाच्या दुरुस्ती साठी रु. ४४.४७ कोटी अशा एकूण रु ९८.१४ कोटीची आवश्यकता आहे. त्यामुळे अंदाजपत्रके व त्यांच्या मान्यतेची प्रक्रिया बरीच क्लिष्ट असल्याने वेळ लागत होता. मात्र सातत्याच्या पाठपुराव्याने सर्व त्रुटी व आवश्यक बाबींची पूर्तता करून प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात आला होता. कालच्या बैठकीमध्ये यास मान्यता देखील प्राप्त झाली आहे. आता निधी मागणीसाठी सदरील प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडून पुढील आठवड्यात शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

शासनाची मंजूरी लवकरात लवकर मिळवून घेण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून अनेक दिवसापासून बंद असलेली ही योजना आता लवकरच सुरू होण्याच्या टप्प्यात आहे.

 

Previous Post

लेडीज क्लबच्या हिरकणी पुरस्काराचे थाटात वितरण

Next Post

धाराशिव शहरात तरुणात राडा , तीन जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव शहरात तरुणात राडा , तीन जखमी

ताज्या बातम्या

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

September 11, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!

September 11, 2026
बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026

Recent Posts

  • ‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा
  • ‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!
  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!