कळंब – आरोपी नामे-राजेंद्र गणेशलाल रुणवाल, वय 57 वर्षे, रा. गणेश नगर तांदुळवाडी रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.15.01.2024 रोजी 20.30 वा. सु. होळकर चौक कळंब येथे महाराष्ट्र शासन निर्णय क्र सीआरटी.2015/प्र/क्र./37 ता.क्र-2 दि. 18 जुन 2016 अन्वये काढलेल्या निर्देशाचा अवज्ञा करुन इतरांचे जिवीतास सुरक्षीतता धोक्यात आणणारी कृती करुन नायलान मांजा विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी नायलान मांजाचे साहित्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि.सं. कलम 188, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 5 अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
अपघातात दोन ठार
आंबी : आरोपी मयत नामे- कृष्णा तुकाराम चव्हाण, रा. मुंगशी, ता. माढा जि. सोलापूर हे दि.13.12.2023 रोजी 20.00 वा. सु. सोनारी साखर कारखाण्याच्या जवळा मोटरसायकलवरुन ट्रॅक्टर ट्रेलर चे टायर घेवून जात होते. दरम्यान आरोपी मयत नामे-कृष्णा चव्हाण यांनी त्यांचे ताब्यातील स्पेलेंन्डर प्रो मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल ही खड्यात आदळल्याने त्यांचा तोल जावून गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे खाली पडून स्वत:चे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हणुमंत शंकर लोंढे, वय 24 वर्षे, रा. मुंगशी, ता. माढा जि. सोलापूर यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : आरोपी मयत नामे-कृष्णा बाबा बनसोडे, वय 25 वर्षे, व सोबत भाउ फिर्यादी नामे- बालाजी बाबा बनसोडे, वय 21 वर्षे, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि. 24.10.2023 रोजी 16.30 वा. सु. नारंवाडी पाटीजवळ पुलावरुन स्कुटी क्र एमएच 25 ए.व्ही. 5254 हीवरुन जात होते. दरम्यान कृष्णा बनसोडे यांनी त्यांचे ताब्यातील स्कुटी ही हायगई व निष्काळजीपणे चालवून अचानक स्कुटी स्लीप होवून रोडवर खाली पडून स्वत:चे डोक्यास गंभीर मार लागुन उपचार दरम्यान मयत झाले. व फिर्यादी नामे- बालाजी बनसोडे हेकिरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी बनसोडे यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.