• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बाऊन्सरच्या गराड्यात धाराशिव जिल्हा परिषद सभापतींची निवड; महायुतीचा चारही जागांवर झेंडा

admin by admin
March 27, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांच्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करत महायुतीने चारही जागांवर आपला झेंडा फडकवला. सातारा जिल्हा परिषदेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या निवडणुकीत चक्क खाजगी बाऊन्सर्सचा मोठा गराडा पाहायला मिळाला.

नुकत्याच धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ४५ विरुद्ध १० असा एकतर्फी सामना रंगला होता. यामध्ये अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषाताई गायकवाड यांची निवड झाली होती. या निवडीनंतर आज सभापती पदांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

असे झाले सत्तावाटप 

वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महायुतीमध्ये सभापती पदासाठी २:१:१ असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. त्यानुसार भाजपला दोन, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक सभापती पद देण्यात आले.

  • भाजप: सिद्धेश्वर कोरे (अर्थ आणि बांधकाम )आणि विश्वास कोकणे  ( समाजकल्याण  )

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): भाऊसाहेब खरतडे ( कृषी आणि पशुसंवर्धन )

  • शिवसेना (शिंदे गट): पूजा शिंदे (महिला आणि बालविकास सभापती)

सुरुवातीला महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी सभापती पदावर प्रबळ दावेदारी सांगितली होती. त्यातच महाविकास आघाडीनेही आपले उमेदवार उभे केल्यामुळे ही निवडणूक अत्यंत रंजक आणि चुरशीची झाली होती. मात्र, महायुतीने एकजूट दाखवत सर्व जागा जिंकल्या. निवडीनंतर बोलताना सदस्यांनी सांगितले की, “योग्य उमेदवाराला संधी मिळाली आहे, आमच्यात कोणताही वाद नाही. महायुती म्हणून आम्ही निवडून आलो आणि महायुती म्हणूनच काम करू.”

सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर्स तैनात:

अलीकडेच सातारा जिल्हा परिषदेमध्ये राजकीय गोंधळ पाहायला मिळाला होता. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा परिषद सभापती निवडीत मोठी खबरदारी घेण्यात आली होती. जिल्हा परिषद सदस्यांच्या सुरक्षेसाठी थेट खाजगी बाऊन्सर्स तैनात करण्यात आले होते. पुणे आणि सोलापूर येथून विशेष बाऊन्सर्स मागवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला बाऊन्सर्सचाही समावेश होता. यामुळे जिल्हा परिषद आवारात छावणीचे स्वरूप आले होते.

पक्षप्रवेश करूनही पदरी निराशाच

या सर्व राजकीय घडामोडींमध्ये एक लक्षवेधी बाब समोर आली आहे. माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या सत्तावाटपात सावंत यांच्या पदरी निराशाच पडली असून त्यांना कोणतेही पद मिळालेले नाही.तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका धुरगुडे यांना देखील पदापासून वंचित राहावे लागले.


Previous Post

‘ऑर्डर घ्यायला किती वेळ लागणार?’ विचारल्याचा राग; कळंबमध्ये ग्राहकांवर चाकू आणि बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला

Next Post

धाराशिव झेडपी सभापती निवडीत राणा पाटलांचा वरचष्मा, स्वकीयांसह मित्रपक्षांत मोठी खदखद

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव झेडपी सभापती निवडीत राणा पाटलांचा वरचष्मा, स्वकीयांसह मित्रपक्षांत मोठी खदखद

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!