• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘आमच्याबद्दल का सांगितले?’ या रागातून सास्तूरमध्ये संपूर्ण कुटुंबावर जीवघेणा हल्ला; अपंग बहिणीलाही मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
187
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा : ‘आमच्याबद्दल लोकांत काहीही का सांगितले?’ असा जाब विचारत लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करून एकाच कुटुंबातील पाच जणांना गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे घडला आहे. संतापजनक बाब म्हणजे, हल्लेखोरांनी फिर्यादीच्या अपंग बहिणीलाही बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओमकार कमलाकर पर्णे, महेश कमलाकर पर्णे आणि अनुसया कमलाकर पर्णे (सर्व रा. सास्तूर, ता. लोहारा, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी व्यंकट शिवाप्पा माळी (वय ४५, रा. सास्तूर) यांनी १६ एप्रिल रोजी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयित आरोपींनी सुरुवातीला व्यंकट माळी यांच्या पत्नीला फोन करून ‘तुम्ही आमच्याबद्दल काही पण का सांगितले?’ अशी विचारणा करत वाद घातला. यानंतर रागाच्या भरात आरोपींनी माळी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड आणि दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

अपंग बहिणीसह वृद्ध आई-वडिलांनाही मारहाण

हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीची पत्नी, आई, वडील आणि अपंग बहीण उमल यांच्यावरही आरोपींनी अमानुष हल्ला चढवला. त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करत जखमी केले. तसेच, जाताना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या मारहाणीनंतर व्यंकट माळी यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून लोहारा पोलीस ठाण्यात आरोपी ओमकार पर्णे, महेश पर्णे आणि अनुसया पर्णे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८१(२), ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५) यासह ‘अपंग व्यक्तीचा अधिकार अधिनियम’ कलम ९२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे सास्तूर परिसरात खळबळ उडाली असून, लोहारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामात ६ लाखांच्या खंडणीसाठी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; वाशी पोलिसांत चौघांवर गुन्हा

Next Post

जुन्या भांडणाच्या कुरापतीतून तुरोरीत बाप-लेकाला बेदम मारहाण; ५ जणांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जुन्या भांडणाच्या कुरापतीतून तुरोरीत बाप-लेकाला बेदम मारहाण; ५ जणांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!