• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामात ६ लाखांच्या खंडणीसाठी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; वाशी पोलिसांत चौघांवर गुन्हा

जेसीबी चालकालाही बेदम मारहाण करत लुटले मोबाईल; वाशी फाट्याजवळील गायरानातील घटना

admin by admin
April 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम विनाअडथळा करू देण्यासाठी तब्बल सहा लाख रुपयांची खंडणी मागत एका ४३ वर्षीय महिलेला लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार वाशी फाट्याजवळील गायरानात घडला. ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत आरोपींनी महिलेला गंभीर जखमी केले, तसेच जेसीबी चालकालाही मारहाण करून तिघांचे मोबाईल हिसकावून घेतले. याप्रकरणी भूम येथील चौघांवर वाशी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडुरंग लक्ष्मण माने, राजू लक्ष्मण माने, नाना अंकुश माने आणि सलमान पठाण (सर्व रा. भूम, ता. भूम, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शोभा धोंडीराम जाधव (वय ४३, रा. कैकाडी गल्ली, मंडई परंडा, ता. परंडा) यांनी १६ एप्रिल रोजी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास वाशी फाट्याजवळील गायरानात शोभा जाधव या वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम करत होत्या. यावेळी संशयित आरोपी त्या ठिकाणी आले. ‘हे काम करून देण्यासाठी आम्हाला सहा लाख रुपये दे,’ अशी थेट खंडणी त्यांनी जाधव यांच्याकडे मागितली. जाधव यांनी विरोध केला असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

या जीवघेण्या हल्ल्यादरम्यान आरोपींनी शोभा जाधव यांचे दोन मोबाईल फोन हिसकावून घेतले. तसेच, तेथे उपस्थित असलेले जेसीबी ऑपरेटर मनोज धनवे यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.

या गंभीर प्रकारानंतर शोभा जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून वाशी पोलीस ठाण्यात पांडुरंग माने, राजू माने, नाना माने आणि सलमान पठाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, १८१(२), ११८(१), ११५(२), ३५२, ११९(१), ३०८(४), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(२) आणि २९६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या खंडणी व मारहाणीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आईसह जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

Next Post

‘आमच्याबद्दल का सांगितले?’ या रागातून सास्तूरमध्ये संपूर्ण कुटुंबावर जीवघेणा हल्ला; अपंग बहिणीलाही मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

'आमच्याबद्दल का सांगितले?' या रागातून सास्तूरमध्ये संपूर्ण कुटुंबावर जीवघेणा हल्ला; अपंग बहिणीलाही मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!