• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आईसह जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

admin by admin
April 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : ‘तू मला आवडतेस’ असे सांगून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच गावातील एका तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ‘याबद्दल कोणाला काही सांगितले, तर तुला आणि तुझ्या आईला जिवे मारीन’, अशी गंभीर धमकीही या नराधमाने दिली होती. या प्रकरणी पीडितेच्या जबाबावरून ढोकी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणावर पोक्सो (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वय १५ वर्षे असून (नाव व गाव गोपनीय), ती आरोपीच्याच गावातील रहिवासी आहे. १ एप्रिल २०२५ ते ४ एप्रिल २०२६ या वर्षभराच्या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी तरुणाने पीडित मुलीला ‘तू मला आवडतेस’ असे म्हणून तिच्या तसेच स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

या भयानक प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. नराधम आरोपीने तिला ‘ घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काहीही सांगितले, तर तुला आणि तुझ्या आईला जिवे ठार मारीन,’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे भितीपोटी तिने सुरुवातीला हा प्रकार कुणालाही सांगितला नाही.

मात्र, अखेर १६ एप्रिल २०२६ रोजी पीडितेने पोलिसांसमोर आपबिती मांडली. पीडित मुलीने दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून ढोकी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(आय)(एम), ६५(१), ७८, ३५१(२)(३) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) कलम ४, ६, ८ अन्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या पोलिसांनाच धमकी; ‘व्हिडिओ व्हायरल करून माज जिरवतो’ म्हणणाऱ्या दोघांवर गुन्हा

Next Post

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामात ६ लाखांच्या खंडणीसाठी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; वाशी पोलिसांत चौघांवर गुन्हा

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामात ६ लाखांच्या खंडणीसाठी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; वाशी पोलिसांत चौघांवर गुन्हा

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!