• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या पोलिसांनाच धमकी; ‘व्हिडिओ व्हायरल करून माज जिरवतो’ म्हणणाऱ्या दोघांवर गुन्हा

admin by admin
April 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
197
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

आंबी : रस्त्यावर आडवी लावलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून पोलिसांशी हुज्जत घालत, अंगावर धावून जाऊन ‘व्हिडिओ काढून व्हायरल करतो आणि तुमचा माज जिरवतो’ अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सोनारी येथे घडला आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत आंबी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत राजेंद्र पवार (रा. घुगी, ता. जि. धाराशिव) आणि अशोक शंकर देशमुख (रा. गौर वाघोली, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सुशीलकुमार मुकुंद कोळेकर (वय ३५) हे इतर कर्मचाऱ्यांसह १५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सोनारी येथील रेस्ट हाऊस चौक ते परंडा जाणाऱ्या रस्त्यावर शासकीय कर्तव्य बजावत होते. यावेळी तिथे एक क्रूझर गाडी (क्र. एमएच २४ व्ही ४२६७) रस्त्यावर आडवी लावलेली होती. या गाडीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याने, पोलीस कर्मचारी कोळेकर यांनी संबंधित गाडीधारकांना ‘तुमच्या गाडीमुळे ट्रॅफिक जॅम झाले आहे, वाहन बाजूला काढा’ असे सांगितले.

वाहन काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने संशयित आरोपी श्रीकांत पवार आणि अशोक देशमुख यांनी कोळेकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत उद्धटपणाची आणि आरेरावीची भाषा वापरत आरडाओरड सुरू केली. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जात, ‘तुमचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करून तुमचा माज जिरवतो’ अशी थेट धमकी दिली. या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण झाला.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुशीलकुमार कोळेकर यांनी १६ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी श्रीकांत पवार आणि अशोक देशमुख यांच्याविरुद्ध आंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २२३, २८२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत.

Previous Post

तांत्रिक उत्पादनावर नको, केवळ ‘पीक कापणी’च्या आधारेच विमा द्या : आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आईसह जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आईसह जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group