• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वृद्धेची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; निपाणी शिवारातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 23, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
732
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : अज्ञात कारणावरून एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला जबरदस्तीने विहिरीत ढकलून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील निपाणी शिवारात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बदामबाई सूर्यभान गिते (वय ६०, रा. आंद्रुड, ता. भूम, जि. धाराशिव) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बदामबाई गिते या आंद्रुड येथील रहिवासी आहेत. मंगळवारी (ता. २१) मध्यरात्री साडेबारा ते सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आरोपी प्रशांत राम महाकले (रा. लांजेश्वर, ता. भूम) आणि गणेश राजेंद्र गिरी (रा. आंद्रुड, ता. भूम) यांनी बदामबाई यांना निपाणी शिवारातील एका विहिरीजवळ नेले. तेथे अज्ञात कारणावरून आरोपींनी त्यांना जबरदस्तीने विहिरीत ढकलून दिले. पाण्यात बुडून बदामबाई यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी मयत महिलेचे पती सूर्यभान एकनाथ गिते (वय ७०, रा. आंद्रुड) यांनी बुधवारी (ता. २२) वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रथम खबर दिली.

सूर्यभान गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत महाकले आणि गणेश गिरी या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(३) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींनी हे कृत्य नेमक्या कोणत्या कारणासाठी केले, हे अद्याप समजू शकले नसून वाशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

Next Post

जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; पवनचक्कीचे ३६ लाखांचे नुकसान, तर बसस्थानकातून प्रवाशाचे ४३ हजार लांबविले

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; पवनचक्कीचे ३६ लाखांचे नुकसान, तर बसस्थानकातून प्रवाशाचे ४३ हजार लांबविले

ताज्या बातम्या

लोहारा परिसरात जुगार अड्ड्यांवर छापेमारी; १२ जण ताब्यात, ९.४ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोहारा परिसरात जुगार अड्ड्यांवर छापेमारी; १२ जण ताब्यात, ९.४ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 17, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

बडा धमाका: ‘ऑपरेशन टायगर’ फत्ते? ओमराजे निंबाळकर हाती धनुष्यबाण घेणार, शिंदे गटात एन्ट्री कन्फर्म!

June 17, 2026
सुप्रीम कोर्टाचा आदेश: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकरच

पवनराजे निंबाळकर हत्याकांड – निकाल का लांबला? कोर्ट ऑर्डरमधून आले समोर; ‘हे’ ठरले कारण …

June 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात बाईक चोरांचा धुमाकूळ! भूम, तामलवाडी आणि कळंबमधून ३ दुचाकी लंपास; पोलिसांत गुन्हे दाखल

June 16, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘माझ्या घराच्या मॅटरमध्ये पोलिसांना का फोन केला?’ कारची काच फोडत ६९ वर्षीय वृद्धाला दगडाने बेदम मारहाण; ढोकी पोलिसांत गुन्हा

June 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group