• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

admin by admin
April 22, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : धाराशिव जिल्ह्यात चोरांसह गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला असून, वाशी, कळंब आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीच्या एकामागोमाग एक घटना समोर आल्या आहेत. यात लाखांची घरफोडी, दुकाने फोडणे, दुचाकी आणि केबल चोरीसह घरासमोरून ट्रॅक्टर जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाशी : घरासमोरून ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न

दहिफळ शिवारात राहणारे हरिदास व्यंकटराव विर (वय ५८, रा. वीर वस्ती शेंडी, ता. वाशी) यांचा ट्रॅक्टर (क्र. एमएच २५ एएल ०३०८) सोमवारी (ता. २० एप्रिल) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रकाश चंद्रकांत पवार (रा. लोणखस) आणि त्याच्यासोबतच्या दोन अनोळखी व्यक्तींनी घरासमोरून जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने फिर्यादी यांना हा प्रकार वेळीच लक्षात आला. याप्रकरणी हरिदास विर यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब : घरफोडीत पावणेचार लाखांचा ऐवज लंपास

कळंब तालुक्यातील बोर्डा येथे घरफोडीची मोठी घटना घडली. भारत भगवान काळे (वय ५९) यांच्या घराच्या चॅनल गेटचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील तब्बल १२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ९८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २० ते २१ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी कळंब पोलिसांत कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कळंब : शटर उचकटून दुकानांत चोऱ्या

कळंबमधील डिकसळ (संभाजीनगर) येथील श्रद्धा बॅग हाऊस या दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तीने उचकटून कॅश काउंटरमधील १५ हजार रुपये रोख रकमेची चोरी केली. चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता नगरपरिषद शॉपिंग सेंटरमधील शेजारील मॉडर्न कलेक्शन आणि शिंदे क्लॉथ सेंटर या दोन दुकानांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. उमाकांत दासराव जगधने (वय ४६) यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांत कलम ३३१(४), ३०५, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब : घरासमोरून दुचाकी चोरीला

मस्सा (खं.) येथून ओमकार गोकुळ इंगोले (वय २२) यांची ८० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न दुचाकी (क्र. एमएच २५ बीजी ५९९२) अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली. ही घटना १६ ते १७ एप्रिलच्या दरम्यान घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद आहे.

नळदुर्ग : सव्वा लाखांच्या केबल आणि वायरची चोरी

नळदुर्ग येथील बूरेज क्र. ०१ येथून सप्लाय केबल, पॅनेलमधील तांब्याची वायर आणि एमसीबी असा एकूण १ लाख २० हजार २३६ रुपयांचा माल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. ही घटना २२ ते २३ मार्च दरम्यान घडली असून, प्रसाद बळवंतराव कांबळे (वय ४६, रा. तुळजापूर) यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात २१ एप्रिल रोजी कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Previous Post

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

वृद्धेची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; निपाणी शिवारातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

वृद्धेची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; निपाणी शिवारातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!