• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अर्ध्या किमतीत सोने देण्याचे आमिष; वृद्धाची सात लाख रुपये व मंगळसूत्राची फसवणूक

admin by admin
May 2, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा: वीस तोळे सोने अर्ध्या किमतीत देण्याचे आमिष दाखवून एका ६८ वर्षीय वृद्धाची सात लाख रुपये आणि पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना देवळाली-आरसोली रोडवर घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांची नावे आणि अन्य दोन अज्ञात अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफराबाद (जि. जालना) येथील भोकरदन रोड परिसरात राहणारे भिकाजी वामनराव लोखंडे (वय ६८) यांना आरोपींनी २० तोळे सोने अर्ध्या भावात देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून लोखंडे हे शुक्रवार, १ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास देवळाली-आरसोली रोडवर आले होते.

याठिकाणी आरोपी काजल काळे, हमराज काळे आणि त्यांचे इतर दोन साथीदार तिथे आले. आरोपींनी ठरल्याप्रमाणे लोखंडे यांच्याकडून तब्बल सात लाख रुपये रोख घेतले. तसेच, पाहण्याच्या बहाण्याने लोखंडे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्रही स्वतःकडे घेतले. मात्र, ठरलेले सोने न देता आणि पैसे व मंगळसूत्र परत न करता आरोपींनी त्यांची फसवणूक केली.

आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भिकाजी लोखंडे यांनी तत्काळ परंडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) काजल काळे, हमराज काळे व इतर दोन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३(५) अन्वये परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही आमिषाला बळी पडून आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

हजार रुपयांची ‘लाईव्ह’ बातमी, कुंभकर्ण नगरपालिका आणि पत्रकारितेचा ‘बाजार’

Next Post

रेशनकार्डविना धान्य देण्यास नकार दिल्याने राडा; दुकानातील मशीन फोडून २५ हजारांचे नुकसान

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

रेशनकार्डविना धान्य देण्यास नकार दिल्याने राडा; दुकानातील मशीन फोडून २५ हजारांचे नुकसान

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!