• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

हजार रुपयांची ‘लाईव्ह’ बातमी, कुंभकर्ण नगरपालिका आणि पत्रकारितेचा ‘बाजार’

admin by admin
May 2, 2026
in झलक
Reading Time: 1 min read
हजार रुपयांची ‘लाईव्ह’ बातमी, कुंभकर्ण नगरपालिका आणि पत्रकारितेचा ‘बाजार’
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

सकाळचे सात वाजलेले. कोंबड्याने अजून नीट बांगही दिली नसेल, पण धाराशिवच्या समर्थनगरमधल्या एका जागरूक नागरिकाचा फोन खणाणला. फेसबुकच्या अथांग महासागरातून माझा नंबर शोधून काढण्याची त्यांची जिद्द पाहून मला साक्षात कोलंबसची आठवण आली. एवढ्या सकाळी फोन आलाय म्हणजे नक्कीच देशावर किंवा किमान धाराशिववर एखादं मोठं संकट आलं असावं, या विचाराने मी फोन उचलला.पण संकट देशावर नव्हतं, तर समर्थनगरच्या रस्त्यांवर होतं!

नगरपालिकेचा ‘मोफत ॲक्युप्रेशर’ प्रकल्प

फोनवरच्या साहेबांची व्यथा अगदी साधी आणि ‘दुखऱ्या’ स्वरूपाची होती. करंजकर हॉस्पिटलसमोरचा रस्ता खराब झालाय आणि नाली तुंबून ओव्हरफ्लो झालीय. आता बघा, आपल्या नगरपालिकेला असल्या क्षुल्लक गोष्टींचा त्रास देणे म्हणजे पापच! आपली नगरपालिका म्हणजे साक्षात कुंभकर्णाची मॉडर्न आवृत्ती.

मी त्यांना आपला नेहमीचा सरकारी आणि गुळगुळीत सल्ला दिला – “नगरपालिकेला निवेदन द्या.”

त्यावर पलीकडून आलेला उसासा सांगत होता की, ‘निवेदन’ या शब्दावरचा त्यांचा आणि समर्थनगरचा विश्वास कधीच उडालाय. त्यांनी अनेकदा निवेदने दिली, पण पालिकेचे अधिकारी बहुधा त्या कागदांच्या होड्या करून तुंबलेल्या नालीत सोडत असावेत. मुळात रस्ता खराब नाहीय, पालिकेने नागरिकांना चालता-चालता मोफत ‘ॲक्युप्रेशर’ची सोय करून दिलीय! आणि तुंबलेली नाली? तो तर डासांसाठी उभारलेला ‘फाइव्ह स्टार स्विमिंग पूल’ आहे, हे या लोकांना कधी समजणार कोण जाणे!

“पत्रकारांनाही प्रपंच असतोच की!” – बातमीचं रेटकार्ड

मी म्हटलं, “ठीक आहे, त्या निवेदनाची प्रत आणि रस्त्याचा एक छानसा फोटो मला व्हॉट्सॲप करा.”

त्यावर पठ्ठ्याने थेट ‘गुगली’च टाकली! साहेब म्हणाले, “अहो, नुसता फोटो कशाला? तुम्ही ‘लाईव्ह’ बातमी का करत नाही? वाटल्यास एक हजार रुपये मानधन देतो आम्ही!”

बाबो! हजाराची कडक नोट आणि थेट ‘लाईव्ह’ कव्हरेज! बरं, त्यांची ही ऑफर म्हणजे लाच नव्हती, तर ती त्यांची ‘सहानुभूती’ होती. ते अत्यंत कळवळून म्हणाले, “पत्रकारांना पण प्रपंच असतोच की!” म्हणजे आमचा प्रपंच चालवायला बातमीचं ‘पॅकेज’ देण्याची त्यांची पूर्ण तयारी होती.

त्यांनी लगेच संदर्भ म्हणून एका जुन्या, ‘पॅकेज-बहाद्दर’ पत्रकाराचं उदाहरण दिलं. म्हणे, “ते पत्रकार साहेब असेच पैसे घेऊन आमच्या बातम्या छापायचे.”

मी त्यांना शांतपणे वास्तवाची जाणीव करून दिली, “साहेब, ते पत्रकार महाशय मागेच वारले.” (बहुधा आता वरती यमराजाच्या दरबारात ‘चित्रगुप्त भ्रष्टाचाराच्या विळख्यात’ अशी एखादी ‘लाईव्ह’ बातमी ते स्वर्गात करत असावेत).

शोध ‘पॅकेज’वाल्या पत्रकाराचा…

त्यांच्या या प्रामाणिक ‘ऑफर’वर मी त्यांना हसत हसत शब्द दिला, “मी पैसे घेऊन बातम्या देणारा एखादा पत्रकार तुमच्याकडे नक्की पाठवतो.”

फोन तर ठेवला, पण आता मागचे दोन तास मी डोक्याला हात लावून बसलोय.

अडचण अशी नाहीये की, पैसे घेणारे पत्रकार मिळत नाहीत; अडचण अशी आहे की, या ‘पेमेंट’वाल्यांच्या यादीत नंबर एकला कोणाला पाठवू? ५०० रुपयात फेसबुक लाईव्ह करणारा पाठवू, की हजार रुपयात ‘ब्रेकिंग न्यूज’ची लाल पट्टी चालवणारा पाठवू? मार्केटमध्ये एवढी ‘कॉम्पिटिशन’ आहे की, या एका हजार रुपयांच्या ‘टेंडर’साठी माझ्या डोळ्यासमोर डझनभर पत्रकारांचे चेहरे तरळत आहेत. कुणाचा रेट जास्त, तर कुणाची ‘लाईव्ह’ करण्याची स्टाईल जास्त!

एकंदरीत काय, तर नगरपालिका कायमची डुलकीत आहे, सामान्य माणूस हजार-पाचशेच्या नोटा मोजून न्यायाची वाट पाहतोय, आणि पत्रकारितेच्या या भरगच्च बाजारात ‘होलसेल’ रेटने बातम्या विकल्या जात आहेत. आता विचार करतोय, मीच एखादा ‘पेटीएमचा बारकोड’ गळ्यात अडकवून बातमी करायला जावं का? कारण शेवटी काय… “पत्रकारांनाही प्रपंच असतोच की!”

– बोरूबहाद्दर

Previous Post

धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक: भगव्या ध्वजावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले..

Next Post

अर्ध्या किमतीत सोने देण्याचे आमिष; वृद्धाची सात लाख रुपये व मंगळसूत्राची फसवणूक

Next Post
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अर्ध्या किमतीत सोने देण्याचे आमिष; वृद्धाची सात लाख रुपये व मंगळसूत्राची फसवणूक

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!