• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, November 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

admin by admin
May 4, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :  शहरातील विकास नगर भागात एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामानिमित्त घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब गंगाधार पाटील (वय ६३, रा. रायगड फंक्शन हॉलच्या पाठीमागे, विकास नगर, धाराशिव) आणि योगेश फुलसे हे दोघे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. बंद घराची पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी २४ एप्रिल रोजी रात्री ११ ते २५ एप्रिलच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडले.

घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील सामानाची उचकापाचक केली. यात त्यांनी ६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ९३ हजार ७६० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

बाहेरगावाहून परतल्यानंतर घरफोडी झाल्याचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बाळासाहेब पाटील यांनी ३ मे रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवचे ‘पे-न्यूज’ स्टार्टअप्स: बातमीसाठी ‘रेट कार्ड’ आणि पत्रकारांचे दोन भन्नाट गट!

Next Post

रत्नापूरमध्ये दोन भावांसह आईला जमावाकडून बेदम मारहाण; २० जणांवर गुन्हा दाखल

Next Post
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

रत्नापूरमध्ये दोन भावांसह आईला जमावाकडून बेदम मारहाण; २० जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : दुचाकीस्वार चोरट्यांनी भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले

November 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी : दळवेवाडी येथील जीआर प्लॉट परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला

November 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नळदुर्ग : उसाच्या गाडीवरून झालेल्या वादात थरार! कारला आयशरची धडक देऊन खुनाचा प्रयत्न

November 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : बहिणीला नांदवण्याच्या वादातून ४२ वर्षीय व्यक्तीवर चाकू व लोखंडी रॉडने खुनी हल्ला

November 23, 2026
‘राम नाम सत्य म्हणजे नेमके काय? हा सत्तेचा माज’; संजय शिरसाटांच्या दाव्यावर आमदार कैलास पाटील यांचा सडेतोड पलटवार

‘राम नाम सत्य म्हणजे नेमके काय? हा सत्तेचा माज’; संजय शिरसाटांच्या दाव्यावर आमदार कैलास पाटील यांचा सडेतोड पलटवार

November 23, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : दुचाकीस्वार चोरट्यांनी भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले
  • वाशी : दळवेवाडी येथील जीआर प्लॉट परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला
  • नळदुर्ग : उसाच्या गाडीवरून झालेल्या वादात थरार! कारला आयशरची धडक देऊन खुनाचा प्रयत्न
  • वाशी : बहिणीला नांदवण्याच्या वादातून ४२ वर्षीय व्यक्तीवर चाकू व लोखंडी रॉडने खुनी हल्ला
  • ‘राम नाम सत्य म्हणजे नेमके काय? हा सत्तेचा माज’; संजय शिरसाटांच्या दाव्यावर आमदार कैलास पाटील यांचा सडेतोड पलटवार
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!