• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

इटकळमध्ये दुचाकीच्या वादातून दोन गटांत राडा; नळदुर्ग पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल

admin by admin
May 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील साई मंगल कार्यालयाजवळ दुचाकी अंगावर आल्याच्या आणि कट मारल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (ता. १३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीत दोन्ही बाजूंनी काठ्या आणि लाथाबुक्क्यांचा वापर करण्यात आला असून, एका महिलेचे ४ तोळ्यांचे मंगळसूत्रही गहाळ झाले आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. १४) नळदुर्ग पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांतील तब्बल २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या गटाची फिर्याद : दुचाकी अंगावर आल्याचा जाब विचारल्याने मारहाण

या घटनेत पहिली फिर्याद महेबुब सत्तार शेख (वय ४२, रा. इटकळ) यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार, महेबुब शेख आणि त्यांचे मित्र शामराव क्षीरसागर हे दुचाकीवरून जात असताना, समोरून आलेल्या आरोपींनी त्यांची दुचाकी अंगावर आणली. ‘दुचाकी अंगावर का आणली?’ याचा जाब विचारल्याच्या रागातून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली आणि शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी महेश प्रभाकर पाटील, अजित अशोक पाटील, शैलेश्वर प्रभाकर पाटील, सोमनाथ पाटील, पप्पू पाटील (सर्व रा. नांदुरी, ता. तुळजापूर), धनराज प्रभाकर कुताडे आणि संदीप चिनगुंडे (दोघे रा. अणदूर) या सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या गटाची फिर्याद : मारहाणीत महिलेचे मंगळसूत्र तुटले

दुसऱ्या गटाकडून महेश प्रभाकर पाटील (वय ५३, रा. नांदुरी) यांनी उलट फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश पाटील, अजित पाटील, शैलेश्वर पाटील, त्यांचे मेहुणे धनराज कुताडे आणि संदीप चिनगुंडे यांना दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून जमावाने शिवीगाळ करत काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. या झटापटीत फिर्यादीचे मेहुणे धनराज यांची पत्नी वैशाली कुताडे यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे मंगळसूत्र तुटून खाली पडले, तसेच जमावाने जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या उलट फिर्यादीवरून हारुण शेख, दौला शेख, अफसर शेख, तौफीक शेख, जहर शेख, समीर मुजावर, आशपाक मुजावर, खादीर शेख, सादीक शेख, अफजल मुजावर, अफजल शेख, जैनुद्दीन शेख, अरबाज शेख, फत्तू खुदादे, असलम मुजावर, मदार शेख, शरीफ शेख, रेहान शेख, महेबुब नदाफ, हुजेफा शेख आणि आयान मुजावर (सर्व रा. इटकळ) अशा एकूण २१ जणांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) आणि ३२४(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या परस्परविरोधी गुन्ह्यांमुळे इटकळ परिसरात तणावाचे वातावरण असून, नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

विठूरायाच्या भेटीची ओढ: आषाढी वारी आणि महाराष्ट्राचा भक्तीसागर

Next Post

बहिणीच्या लग्नात सर्वांच्या पुढे का नाचलास? क्षुल्लक कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बहिणीच्या लग्नात सर्वांच्या पुढे का नाचलास? क्षुल्लक कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!