• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

शेतमालकाने विश्वासाने सांभाळायला दिलेली रक्कम पळवली; शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
May 25, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

शिराढोण (कळंब): रात्री उशीर झाल्याने शेतमालकाने अत्यंत विश्वासाने सालगड्याकडे सांभाळण्यासाठी दिलेली ४ लाख २१ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन सालगडी पसार झाल्याची धक्कादायक घटना रांजणी (ता. कळंब) येथे घडली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात बीड जिल्ह्यातील एका सालगड्याविरुद्ध विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शमशोद्दीन इब्राहीम सय्यद (वय ५३, रा. रांजणी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे फसवणूक झालेल्या शेतमालकाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. तर लक्ष्मण सिध्दु सलगर (रा. मंजरथ, ता. माजलगाव, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी सालगड्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी लक्ष्मण सलगर हा फिर्यादी शमशोद्दीन सय्यद यांच्या शेतात सालगडी (गडी) म्हणून काम करत होता. २८ मार्च २०२६ रोजी शमशोद्दीन यांनी शेतातील काही साहित्य खरेदी करण्यासाठी ४ लाख २१ हजार रुपयांची रोख रक्कम आणली होती. मात्र, रात्री १० वाजेच्या सुमारास बराच उशीर झाल्यामुळे आणि सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांनी ही रक्कम सालगडी लक्ष्मण याच्याकडे विश्वासाने सांभाळण्यासाठी दिली.

२८ मार्चच्या रात्री १० ते २९ मार्चच्या सकाळी ७ वाजेपूर्वीच्या दरम्यान, सालगडी लक्ष्मण सलगर याने मालकाच्या याच विश्वासाला तडा दिला. तो ती सव्वाचार लाखांची रोकड घेऊन शेतातून कोणालाही न सांगता अंधारात निघून गेला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शमशोद्दीन यांनी त्याची शोधाशोध केली, मात्र तो मिळून आला नाही.

अखेर काल (ता. २४ मे) शमशोद्दीन सय्यद यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपी लक्ष्मण सलगर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) आणि ३१६(४) अन्वये (विश्वासघात व फसवणूक) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

Next Post

चोरीचा खोटा आळ आणून बदनामी केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; बावी येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

चोरीचा खोटा आळ आणून बदनामी केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; बावी येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

October 15, 2026
साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?

October 14, 2026
संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

October 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

October 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

October 14, 2026

Recent Posts

  •  तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!
  • ‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?
  • संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
  • भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास
  • सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!