नमस्कार वाचकहो! धाराशिवच्या राजकीय रंगमंचावर सध्या ‘क्रेडिट’ लाटण्याची एक मोठी सर्कस सुरू आहे. विषय आहे बहुचर्चित ‘धाराशिव-तुळजापूर -सोलापूर ‘ रेल्वे मार्गाचा. या मार्गावर आता वेगाने मातीकाम पूर्ण होऊन रुळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे आणि २०२७ पर्यंत रेल्वे धावण्याची शक्यता आहे.
ही खऱ्या अर्थाने धाराशिवकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पण या बातमीपेक्षा जास्त चर्चा रंगलीये ती, या रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन उगीचच ‘सेल्फी’ काढणाऱ्या आणि खोटे श्रेय लाटणाऱ्या ‘फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंह’ यांच्या स्टंटबाजीची! आज ‘बोरूबहाद्दर’ या साहेबांच्या पोकळ दाव्यांची पुराव्यासकट पोलखोल करणार आहेत.
१. बोरूबहाद्दरांचे फेसबुक पिंट्याला खुले आव्हान!
गेली अनेक वर्षे धाराशिवचे नागरिक या रेल्वे मार्गासाठी मोर्चे काढत होते, आंदोलने करत होते. तेव्हा आमचे हे ‘फेसबुक पिंट्या‘ साहेब कुठे होते? साहेबांनी या आंदोलनांना कधी पाठिंबा दिला होता का? रेल्वेसाठी साहेबांनी एखादं साधं ‘स्टेटमेंट’ तरी दिलं होतं का? साहेब, जर तुम्ही खरंच काही केलं असेल, तर त्याचा एखादा पुरावा जनतेला द्या! हे आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे.
२. फ्लॅशबॅक: साहेबांचा राजकीय सोयीचा ‘रेल्वे प्रवास’
रेल्वेचं श्रेय लाटायला निघालेल्या साहेबांना जरा त्यांचा इतिहास आठवून देऊया:
-
२०१४ ची घोषणा आणि साहेबांची मांडलिकशाही: जेव्हा देशाच्या प्रमुखांनी (गुजराती बाबूंनी) या रेल्वेची घोषणा केली, तेव्हा धाराशिवचे खासदार होते ‘हवाई रवींद्र’. आणि आमचे फेसबुक पिंट्या साहेब त्यावेळी कुठे होते? तर ते ‘बारामतीच्या चंद्रराजांचे’ निष्ठावान मांडलिक म्हणून विरोधी पक्षात बसले होते!
-
२०१९ चा दणका आणि ‘गुजराती बाबूं’वर चिखलफेक: २०१९ मध्ये या रेल्वे मार्गाला बजेट मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळाली. त्यावेळी खासदार म्हणून ‘सूर्यराजे’ निवडून आले होते. याच निवडणुकीत फेसबुक पिंट्या साहेब तोंडावर आपटले होते. विशेष म्हणजे, पराभूत होण्यापूर्वी साहेब याच ‘गुजराती बाबूं’वर यथेच्छ चिखलफेक करत होते (ज्याचे पुरावे आणि व्हिडिओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत!).
-
कमळाचा आधार आणि २०२४ चा महा-पराभव: लोकसभेत दारुण पराभव झाल्यावर याच साहेबांनी ‘गुजराती बाबूं’पुढे थेट शरणागती पत्करली आणि हातात कमळ धरलं. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या बायकोला मैदानात उतरवलं, पण सूर्यराजेंनी तब्बल सव्वातीन लाखांच्या मताधिक्याने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला!
३. सूर्यराजेंचा संसदेत लढा, अन् पिंट्याचे ‘बोगस’ पेजवर सेल्फी!
रेल्वेच्या कामाला खऱ्या अर्थाने गती कुणामुळे मिळाली? सूर्यराजेंनी सातत्याने लोकसभेत धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाबाबत प्रश्न उपस्थित करून, दिल्लीत मंत्र्यांचे उंबरठे झिजवून याचा पाठपुरावा केला.
आणि इकडे फेसबुक पिंट्या काय करत होते? तर रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन, इंजिनिअरसारखा पोझ देऊन फोटो काढायचे आणि ‘बोगस माझा’, ‘बोगस २.०’ अशा स्वतःच्याच पाळलेल्या ‘पेड (Paid)’ फेसबुक पेजेसवर “बघा मीच रेल्वे कशी आणली!” अशा बातम्या छापून आणायचे! दिल्लीत पाठपुरावा सूर्यराजेंचा आणि ट्रॅकवर सेल्फी पिंट्याचा, असा हा सगळा बोगस कारभार सुरू होता.
४. सूर्यराजे सत्तेत आल्यामुळे साहेबांची कोंडी!
आता राजकारणाचा गेम असा पलटलाय की, सूर्यराजे थेट सत्तेत आले आहेत. आता अधिकृत श्रेय सूर्यराजेंनाच मिळणार, हे स्पष्ट झाल्यामुळे फेसबुक पिंट्या साहेब प्रचंड चिंतेत पडले आहेत.
आता स्वतःच्या नावाची हवा करण्यासाठी साहेबांनी काही ‘दिव्य’ पत्रकारांना हाताशी धरले आहे. पाकिटे वाटून “मीच कसा पाठपुरावा करत आहे” अशा भासवणाऱ्या बातम्या ‘पेड न्यूज’ म्हणून प्रसिद्ध केल्या जात आहेत. पण साहेब, तुम्ही कितीही ‘दिव्य पत्रकारांना पाकिटे दिली आणि ‘बोगस’ पेजेसवर कितीही सेल्फी टाकले, तरी धाराशिवची जनता सगळं ओळखून आहे.
कारण, लक्षात ठेवा… “यह पब्लिक है, सब जाणती है!”







