• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने निष्ठावंत भाजप नेत्यांचे शक्तीप्रदर्शन?

राणा पाटील यांना निमंत्रण नसल्याने चर्चांना उधाण

admin by admin
August 1, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने निष्ठावंत भाजप नेत्यांचे शक्तीप्रदर्शन?
0
SHARES
571
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजपचे प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला असतानाच, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकट गुंड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषदेच्या धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झालेले आमदार बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने भाजपमधील निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.

रविवार (२ ऑगस्ट) रोजी धाराशिव येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपचे प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड, तसेच भाजपमधील अनेक निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांची नावे आहेत. मात्र, धाराशिवचे भाजप आमदार राणा पाटील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे नेते तथा खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. हे दोन्ही नेते आमदार राणा पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जातात. त्यांच्यासह भाजपमधील निष्ठावंत गटातील नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, सत्कारमूर्ती आमदार बसवराज पाटील हेही आमदार राणा पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जातात. उमरगा तालुक्यातील मुरूम येथील रहिवासी असलेल्या बसवराज पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांचा हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राणा पाटील आणि ॲड. अनिल काळे यांच्यातील वाद उघडपणे समोर आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनीही उघडपणे भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. अशा पार्श्वभूमीवर आयोजित हा कार्यक्रम केवळ विजयाचा सत्कार आहे की भाजपमधील निष्ठावंत गटाचे शक्तीप्रदर्शन, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निमंत्रण पत्रिकेतील राजकीय समीकरणे आणि राणा पाटील यांची अनुपस्थिती यामुळे आता एकच चर्चा रंगली आहे—हा बसवराज पाटील यांचा सत्कार सोहळा आहे की भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा?

Previous Post

उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

ताज्या बातम्या

बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने निष्ठावंत भाजप नेत्यांचे शक्तीप्रदर्शन?

बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने निष्ठावंत भाजप नेत्यांचे शक्तीप्रदर्शन?

August 1, 2026
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

July 31, 2026
औराद येथील वायर चोरीत घंटागाडीचा वापर; नगराध्यक्ष किरण गायकवाड ॲक्शन मोडवर!

औराद येथील वायर चोरीत घंटागाडीचा वापर; नगराध्यक्ष किरण गायकवाड ॲक्शन मोडवर!

July 31, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी; जिल्हा परिषदेत आंदोलनानंतर शिक्षक नियुक्तीचा आदेश

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी; जिल्हा परिषदेत आंदोलनानंतर शिक्षक नियुक्तीचा आदेश

July 31, 2026
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा नगर परिषद प्रशासन बॅकफूटवर! औराद येथील वायर चोरीच्या प्रकरणात कचरा गाडीचा संशयास्पद वापर

July 31, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!