• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

टॅगलाईन चोरीची, उपक्रमही उसना… तरीही ‘मॅडम’ म्हणतात, ‘व्हिजन’ आमचं!

कॉमेडी नाइट्स विथ राणा दादा' - भाग 3

admin by admin
August 5, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
‘आपला जीव धाराशिव’ की ‘आपला इगो धाराशिव’?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

‘आपला जीव धाराशिव‘ ही टॅगलाईन दुसऱ्याची पळवली हे कमी होतं की काय, म्हणून आता ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत राबवला जाणारा टीव्ही आणि मोबाईल बंदीचा उपक्रमही चक्क ‘कॉपी-पेस्ट’ निघाला आहे! दुसऱ्याच्या मुलाला स्वतःचं नाव लावून पेढे वाटण्याचा हा जिल्हा परिषदेचा प्रकार म्हणजे, ‘अक्कल नाही स्वतःची, आणि फुशारकी मारतेय नवसाची’ असाच झाला आहे.

‘शोध’ मॅडमचा, पण अमलबजावणी २०२२ चीच!

सध्या जिल्हा परिषद संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा जो काही ‘महान शोध’ लावून मिरवत आहे, तो मुळात नवा राहिलेलाच नाही. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण २०२२ मध्येच सांगली जिल्ह्यातील मोहिते-वडगाव या ग्रामपंचायतीने ठराव घेऊन हा निर्णय यशस्वीपणे राबवला होता.

बरं, सांगली लांबचं सोडा, खुद्द आपल्या धाराशिव जिल्ह्यातील जकेकूरवाडी या ग्रामपंचायतीनेही २०२२ मध्येच हाच निर्णय घेतला होता. त्यानंतर सारोळा ग्रामपंचायतीनेही हा उपक्रम सुरू केला. विशेष म्हणजे, सारोळा गावात हे सगळं सुरू झालं, तेव्हा ‘माऊली’ (अध्यक्षा अर्चना पाटील) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमानही झाल्या नव्हत्या! पण आता ‘माऊली’ आणि त्यांच्या साहेबांना असं वाटू लागलंय की, त्यांनी ‘व्हिजन’ आणल्यामुळेच पोरांनी पहिल्यांदा पुस्तकं हातात घेतली आहेत.

पुरस्कारासाठी ‘कॉपी-पेस्ट’ची धडपड!

गावकऱ्यांनी, सरपंच आणि ग्रामपंचायतींनी स्वतःच्या बुद्धीने जे उपक्रम वर्षांपूर्वीच सुरू केले, तेच उपक्रम आता ‘उचलून’ त्याला ‘व्हिजन २०३०’ चं भपकेदार लेबल लावलं जात आहे. हा सगळा खटाटोप नेमका कशासाठी सुरू आहे? तर फक्त आणि फक्त शासनाचा एखादा ‘पुरस्कार’ मिळवण्यासाठी! दुसऱ्याच्या संकल्पनेवर डल्ला मारायचा, फुकटचं श्रेय लाटायचं आणि पुरस्काराच्या रांगेत जाऊन उभं राहायचं, हाच या ‘इव्हेंट’ मागचा खरा उद्देश आहे.

स्वतःचं काही आहे की नाही?

‘आपला जीव धाराशिव’ ही भावनिक टॅगलाईन उचललेली… टीव्ही-मोबाईल बंदीचा उपक्रमही उचललेला… गावकऱ्यांच्या कष्टाचे श्रेयही लाटलेले. मग या सगळ्यात ‘स्वतःचं’ असं नक्की काय आहे? तर स्वतःचं फक्त एकच आहे— साहेबांचं ‘फेसबुक लाईव्ह’ आणि ताईंचे ‘फोटोसेशन’!

थोडक्यात सांगायचे तर, ‘व्हिजन २०३०’ हा एक असा डबा निघालाय, ज्याचं कव्हर फक्त नवं आहे, पण आतला माल मात्र सगळा दुसऱ्याचाच ‘उचललेला’ आहे! जनता सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतेय, फक्त ‘लाईक्स’ आणि ‘शेअर्स’च्या दुनियेत अडकलेल्या नेत्यांनाच जमिनीवरचं हे वास्तव दिसत नाहीये.

‘आपला जीव धाराशिव’ की ‘आपला इगो धाराशिव’?

धाराशिवचे विदारक वास्तव: साहेब ‘फेसबुक लाईव्ह’वर, मॅडम ‘व्हिजन २०३०’मध्ये आणि विद्यार्थी शिक्षकांसाठी रस्त्यावर!

Previous Post

माऊली’चा व्हॉट्सॲप बाण, मुंबईतली ‘ती’ रहस्यमयी फाईल आणि निष्ठावंतांचे ‘ओपन चॅलेंज’!

Next Post

धाराशिव तालुक्यात बालविवाहातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव तालुक्यात बालविवाहातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!