• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, August 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

६९ लाखांच्या गांजा व चरससह एकाला अटक, घरात जुगार अड्डाही उघड

admin by admin
August 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It
धाराशिव –  अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), छत्रपती संभाजीनगर विभागाने धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे एक मोठी कारवाई करत अवैध गांजा आणि चरसची विक्री करणाऱ्या एकाला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६९ लाख १९ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीच्या दुमजली आलिशान बंगल्यात जुगाराचा अड्डा देखील उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.२० वाजता एएनटीएफच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तेरणानगर, ढोकी येथे छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी बाप्पा शंकर पवार याच्या घराची झडती घेतली असता, घरात ठेवलेल्या गोण्यांमध्ये ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा आणि १३१ ग्रॅम चरस आढळून आले. तसेच, आरोपीची अंगझडती घेतली असता २१ तोळे सोने आणि रोख रक्कम असा एकूण ६९,१९,१९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आलिशान बंगल्यात चालवायचा पत्त्यांचा क्लब:
आरोपी बाप्पा पवार याचा कोट्यवधी रुपयांचा दुमजली आलिशान बंगला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांना असेही दिसून आले की, अंमली पदार्थांच्या साठ्याव्यतिरिक्त आरोपी त्याच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबवर पत्त्यांचा क्लब (जुगार) चालवत होता. या ठिकाणी पोलिसांना जुगार खेळण्याचे बरेच साहित्यही मिळून आले आहे.
गुन्हा दाखल, एएनटीएफकडून तपास सुरू:
याप्रकरणी आरोपी बाप्पा शंकर पवार याच्याविरुद्ध ढोकी पोलीस ठाणे (जि. धाराशिव) येथे NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा आणि चरस कोठून आणला होता आणि तो कोणाला विक्री करत होता, याचा सखोल तपास आता ANTF कडून केला जात आहे.
सदरची धडक कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, पोलीस अधीक्षक श्री. अजीत टिके, DYSP  साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकुर, स. पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके यांच्यासह पोलीस अंमलदार शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रवींद्र साळवे, राहुल काळे, अतुल तुपे, हरीश मुंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्योती किर्तीकर, प्रियांका पवार आणि आम्रपाली सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
Previous Post

पोलीस ठाण्यात टिप्पर जप्त असताना दुसऱ्या दिवशी भरला टॅक्स!

ताज्या बातम्या

धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

August 13, 2026
धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;

पोलीस ठाण्यात टिप्पर जप्त असताना दुसऱ्या दिवशी भरला टॅक्स!

August 13, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘माऊली’ परतल्या, सभा गाजली! ‘प्रमोशन’च्या बाजाराला अखेर स्थगिती; पण शिक्षणाधिकाऱ्यांच्या ५-७ लाखांच्या ‘खोक्यां’चे काय?

August 13, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिवमध्ये पोलिसांच्या लाचखोरीचा खळबळजनक प्रकार: २५ हजारांची लाच घेऊनही गुन्हा दाखल; कारवाईची मागणी

August 13, 2026
भाजपच्या राड्यानंतर आता शिंदे गटात ‘बॉम्ब’ फुटणार; धाराशिवचं नवं पॉवर-प्ले: शिंदे गटात ‘जुने विरुद्ध नवे’ संघर्ष अटळ!

भाजपच्या राड्यानंतर आता शिंदे गटात ‘बॉम्ब’ फुटणार; धाराशिवचं नवं पॉवर-प्ले: शिंदे गटात ‘जुने विरुद्ध नवे’ संघर्ष अटळ!

August 13, 2026

Recent Posts

  • धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
  • पोलीस ठाण्यात टिप्पर जप्त असताना दुसऱ्या दिवशी भरला टॅक्स!
  • ‘माऊली’ परतल्या, सभा गाजली! ‘प्रमोशन’च्या बाजाराला अखेर स्थगिती; पण शिक्षणाधिकाऱ्यांच्या ५-७ लाखांच्या ‘खोक्यां’चे काय?
  • धाराशिवमध्ये पोलिसांच्या लाचखोरीचा खळबळजनक प्रकार: २५ हजारांची लाच घेऊनही गुन्हा दाखल; कारवाईची मागणी
  • भाजपच्या राड्यानंतर आता शिंदे गटात ‘बॉम्ब’ फुटणार; धाराशिवचं नवं पॉवर-प्ले: शिंदे गटात ‘जुने विरुद्ध नवे’ संघर्ष अटळ!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!