धाराशिव : सार्वजनिक रस्त्यांवर रहदारीस धोकादायकरीत्या वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी कारवाई केली आहे. नळदुर्ग, धाराशिव शहर, लोहारा, उमरगा आणि परंडा येथे एकूण आठ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नळदुर्ग : अस्लम बाबुलाल कुरेशी (वय ४०, रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग) यांची ऑटो रिक्षा क्रमांक एमएच २५ एके २२४२ नळदुर्ग बसस्थानकातील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभी असल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
धाराशिव शहर : काळा मारुती चौक परिसरात आठवडी बाजाराकडून काळा मारुतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्टॅण्डर्ड बिर्याणी दुकानाजवळ दोन छोटा हत्ती वाहने धोकादायकरीत्या उभी असल्याचे आढळले. धिरज बळीराम गावडे (वय २४, रा. बेंबळी) यांच्या ताब्यातील एमएच २५ आर ६६२३ आणि महादेव सुखदेव जाधव (वय ५५, रा. चिलवडी) यांच्या ताब्यातील एमएच ०४ जीएफ ६८४३ या वाहनांप्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
लोहारा : इमाम महेबुब शेख (वय ६०, रा. गणेश कदम प्लॉट, लोहारा) यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन क्रमांक एमएच १३ एसी ८०७१ हे लोहारा-कानेगाव रोडवरील महा ग्रामीण बँकेसमोर सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरीत्या उभे असल्याचे आढळले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
उमरगा : भास्कर बंडू बनसोडे (वय ५१, रा. जुनी पेठ, उमरगा) यांची ऑटो रिक्षा क्रमांक एमएच २४ एटी १७४३ आणि सलीम जब्बार बागवान (वय ४२, रा. तुरोरी) यांचा फळगाडा सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरीत्या उभा असल्याचे पोलिसांना आढळले. या दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
परंडा : परंडा न्यायालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एमएच ४५ एझेड ९६४१ आणि एमएच १२ व्हीएफ २९५९ या दोन चारचाकी गाड्या रहदारीस धोकादायकरीत्या उभ्या असल्याचे पोलिसांना आढळले. या दोन्ही वाहनांच्या चालकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सर्व प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.






