• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘मुलगा हवाय?’… मग १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करा करार! धाराशिवमध्ये ‘बाळ देण्याच्या’ नावाखाली ४८ लाखांचा महाझोल

 आनंदनगर पोलिसांत टोळीवर गुन्हा दाखल

admin by admin
August 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
‘मुलगा हवाय?’… मग १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करा करार! धाराशिवमध्ये ‘बाळ देण्याच्या’ नावाखाली ४८ लाखांचा महाझोल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वंशाचा दिवा हवा या एकाच हव्यासापोटी माणसाची विवेकबुद्धी कशी गहाण पडू शकते, याचा थरारक आणि डोळे पांढरे करणारा प्रकार धाराशिव शहरात उघडकीस आला आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीने चक्क न्यायालयात जाऊन दुसऱ्या महिलेसोबत ‘गर्भधारणेचा करारनामा’ नोटरी करून घेतला गेला. मात्र, हा करार म्हणजे एका सुनियोजित महाठकबाजीची केवळ सुरुवात होती. बाळाच्या जन्माचे स्वप्न दाखवून फिर्यादीकडून तब्बल ४७ लाख ८८ हजार रुपये उकळले गेले आणि शेवटी हाती लागले ते फक्त बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचे काळे धमक्यांचे सत्र!

ओळख, सहानुभूती अन् जाळ्यात ओढण्याची पहिली चाल

सांजा चौक परिसरातील रहिवासी ३८ वर्षीय धनंजय दगडू मदने यांच्या संसाराला एका अपत्याची, त्यातही वंशाच्या दिव्याची तीव्र आस होती. पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरात चिंतेचे सावट होते. २०२० मध्ये मदने यांच्या पत्नीच्या माध्यमातून अश्विनी श्रीराम पाटील (रा. कार्ला, ता. तुळजापूर) हिची या घरात एन्ट्री झाली. “माझा पती मला सोडून गेला आहे, मी एकटी आहे,” असा कांगावा करत अश्विनीने मदने दाम्पत्याची सहानुभूती जिंकली. मदने यांच्या भावनिक दुर्बलतेचा अचूक अंदाज घेत तिने पहिला फास टाकला— “मी तुमच्या पतीपासून गर्भधारणा करून तुम्हाला मुलगा देते, फक्त मला आसरा द्या.”

न्यायालयात घडला अजब करारनामा!

मदने दाम्पत्य या भूलथापांना पूर्णपणे बळी पडले. जानेवारी २०२५ मध्ये या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले. २९ जानेवारी २०२५ रोजी धाराशिव न्यायालयाच्या आवारात वकील व काही साक्षीदारांच्या उपस्थितीत चक्क एक लेखी करारनामा तयार करण्यात आला. पत्नीच्या संमतीने धनंजय यांच्यापासून अश्विनीने गर्भधारणा करावी, असा हा कथित नोटरी करार होता. करारानंतर मदने तुळजापूर येथे अश्विनीसोबत अधूनमधून राहू लागले. मात्र, शरीरसंबंध प्रस्थापित झाल्यानंतरही अश्विनीने गर्भधारणेस सतत विविध वैद्यकीय व तांत्रिक कारणे पुढे करत टाळाटाळ सुरू केली.

पैशांची हाव: प्लॉटच्या पैशांपासून पोकलेनच्या मागणीपर्यंत

अश्विनीच्या जाळ्यात मदने पूर्णपणे अडकले होते. तिचे घरभाडे, आजारपण, कर्जाचे हप्ते या नावाखाली मदने यांच्या खिशातून पैसे गळत राहिले. दरम्यान, मदने यांनी तुळजापूर येथील स्वतःचा एक प्लॉट विकल्याची कुणकुण अश्विनीला लागली. तिने तात्काळ सोलापूरच्या बचत गटाचे कारण सांगून ५ लाखांची थेट मागणी केली. ‘पैसे दिले तरच गर्भधारणा करेन,’ असा थेट सौदाच तिने मांडला.

मुलगा होण्याच्या आशेने मदने यांनी २०२० ते ऑगस्ट २०२६ या काळात रोख २५ लाख ८८ हजार आणि बँक खात्यावरून २२ लाख, असे एकूण ४७ लाख ८८ हजार रुपये अश्विनी व तिच्या साथीदारांच्या घशात घातले.

पडदा फाटला, सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ!

जानेवारी २०२६ मध्ये अश्विनी तुळजापूरचे घर गुपचूप रिकामे करून कार्ला येथे पसार झाली. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी तिच्या भावाने, भुजंग देवकते याने मदने यांना फोन लावला— “पोकलेन खरेदी करण्यासाठी ५ लाख रुपये दे, नाहीतर अश्विनीला पाठवणार नाही!”

मदने यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवताच टोळीचा खरा रंग समोर आला. पार्वती देवकते, जयश्री शिरगिरे, रेश्मा देवकते यांनी धनंजय यांना फोन करून अश्लील शिवीगाळ करत थेट इशारा दिला— “जास्त हुशारी केलीस तर बलात्काराच्या गुन्ह्यात थेट जेलमध्ये सडवू!”

आनंदनगर पोलिसांत धडक, ८ जणांवर गुन्हा दाखल

आपली कोट्यवधींच्या घरात फसवणूक झाल्याचे आणि ही संपूर्ण टोळीच आपल्याला लुटत असल्याचे लक्षात येताच धनंजय मदने यांनी आनंदनगर पोलीस ठाणे गाठून सर्व हकीकत मांडली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्य संशयित अश्विनी पाटीलसह भुजंग देवकते, पार्वती देवकते, रेश्मा देवकते, श्रीदेवी नन्नवरे, दत्ता नन्नवरे, जयश्री शिरगिरे आणि दत्ता गंडदे अशा एकूण आठ जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३१८(४) (फसवणूक), ३५२, ३५१(२), ३५१(३) (धमकावणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बाळाच्या हव्यासापोटी बेकायदेशीर कराराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका व्यक्तीची झालेली ही भीषण फसवणूक सध्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून, पोलीस आता या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करत आहेत.

Previous Post

कळंब : निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवून निष्पापांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ४ वडापाव चालकांवर कळंब पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल

Next Post

२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…

Next Post
२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…

२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा...

ताज्या बातम्या

रिसॉर्टसाठीच तामलवाडी टोलनाक्यावरील गरिबांच्या दुकानांवर बुलडोझर?

पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी काँग्रेस आक्रमक; २१ ऑगस्टला तामलवाडीत धडक आंदोलनाची घोषणा!

August 19, 2026
जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?

जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?

August 19, 2026
२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…

२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…

August 19, 2026
‘मुलगा हवाय?’… मग १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करा करार! धाराशिवमध्ये ‘बाळ देण्याच्या’ नावाखाली ४८ लाखांचा महाझोल

‘मुलगा हवाय?’… मग १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करा करार! धाराशिवमध्ये ‘बाळ देण्याच्या’ नावाखाली ४८ लाखांचा महाझोल

August 19, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवून निष्पापांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ४ वडापाव चालकांवर कळंब पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल

August 19, 2026

Recent Posts

  • पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी काँग्रेस आक्रमक; २१ ऑगस्टला तामलवाडीत धडक आंदोलनाची घोषणा!
  • जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?
  • २०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…
  • ‘मुलगा हवाय?’… मग १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करा करार! धाराशिवमध्ये ‘बाळ देण्याच्या’ नावाखाली ४८ लाखांचा महाझोल
  • कळंब : निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवून निष्पापांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ४ वडापाव चालकांवर कळंब पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!