धाराशिव – गणेशोत्सव शांततेत, निर्भय आणि उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. आनंदनगर, तुळजापूर, धाराशिव शहर, बेंबळी आणि परंडा या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील तब्बल १२४ गुन्हेगारांना गणेशोत्सव कालावधीत संबंधित तालुक्यांच्या हद्दीतून तडीपार (प्रवेशास मनाई) करण्यात आले आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी हे हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत.
१४ ते २५ सप्टेंबरपर्यंत हद्दपारीचे आदेश
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा तसेच निवडणूक व पूर्वीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या समाजकंटकांवर वचक राहावा, यासाठी पाचही पोलीस ठाण्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३(२) अन्वये १२४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले होते.
या प्रस्तावांची पडताळणी करून अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत या १२४ इसमांना धाराशिव शहर, आनंदनगर, तुळजापूर, बेंबळी व परंडा तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. या आदेशांची संबंधितांना रीतसर बजावणी करण्यात आली आहे.
पोलीस ठाणेनिहाय कारवाईचा तपशील:
-
आनंदनगर पोलीस ठाणे (१४ इसम): अजित ऊर्फ बाबा ज्ञानदेव चव्हाण (शिंगोली), मकसूद मुसीफ शेख (विकासनगर), मनोज ऊर्फ राकेश श्याम शिंदे (शिंगोली), नंदकुमार दत्तात्रय सूर्यवंशी, मनोहर दत्तात्रय सूर्यवंशी, विश्वास दत्तात्रय सूर्यवंशी (सर्व रा. सांजा), शांताराम नंदू लोंढे (अमृतनगर), रमनबाई ज्ञानदेव चव्हाण (शिंगोली), आयान अल्ली अहमद अली कुरेशी (शालीमार कॉलनी), बायडाबाई छगन काळे (इंदिरानगर), कमलबाई हिरा काळे (तुळजाईनगर), मेनिकाबाई विकास पवार (उपळा रोड), तालाबाई राजा काळे (तुळजाईनगर), अनुराधा कुंदन पवार (एमआयडीसी, धाराशिव).
-
तुळजापूर पोलीस ठाणे (२४ इसम): संतोष नवनाथ खुने (नेताजी नगर), किरण राजाभाऊ बागडे (नळदुर्ग रोड), ताजुद्दीन रुफीक शेख (वासुदेव गल्ली), भारत तुकाराम राऊत (पुजारी नगर), अजय बंडू क्षीरसागर (वेताळनगर), भीमराव बळीराम देडे (मातंग नगर), सलमान खय्यूम शेख (वासुदेव गल्ली), नागनाथ अरुण सातपुते (जिजामाता नगर), सदाशिव गोविंद भातलवंडे (जुना हंगरगा रोड), अहमद महबूब शेख (वेताळनगर), भारत विठ्ठल भोसले (शुक्रवार पेठ), जावेद करीमोद्दीन शेख (वासुदेव गल्ली), रेवाप्पा आनंद चंदनशिवे (काक्रंबा), अमर रावसाहेब जाधव (तिर्थ खुर्द), लक्ष्मण मेसा गवळी (जवळगा मेसाई), बालाजी वसंत रोडे (ढेकरी), प्रकाश सतीश जेटीथोर (मंगरूळ), बबलू सुभाष चव्हाण (दीपक नगर तांडा), महेबुब मकसूद्दीन शेख (मंगरूळ), महेश विजय लोंढे (हंगरगा पाटी), सचिन अनिल कोरेकर (मंगरूळ) आदी.
-
धाराशिव शहर पोलीस ठाणे (१० इसम): ऋषिकेश ऊर्फ चिंट्या तानाजी जठार (गणेश नगर), सुजीत बापूराव मुंढे (माणिक चौक), कृष्णा गोरख घोडके (वडार गल्ली), नागेश रविकांत बुट्टे (वडार गल्ली), रमजान इस्माईल तांबोळी (खाजा नगर), अहेमद फकीर शेख (एक मिनार परिसर), तौसीफ मंजूर शेख (विजय चौक), प्रमोद श्रीपती जाधव (मोहिते गल्ली), विष्णू सदाशिव गायकवाड (खानापूर), नितीन राजकुमार कदम (इंगळे गल्ली).
-
बेंबळी पोलीस ठाणे (९ इसम): परमेश्वर अनिल शहा, अभिजीत कुमार वाळवे, पार्थ संतोष आगलावे, महादेव चंद्रकांत गरड (सर्व रा. बेंबळी), भीमराव बळीराम देडे (मातंग नगर, तुळजापूर), रुतूराज भास्कर मस्के (केशेगाव), रेश्मा आयरिंग भोसले (धारूर), ज्ञानेश्वर निवृत्ती ऊर्फ चंदर कोळगे (केशेगाव).
-
परंडा पोलीस ठाणे (६७ इसम): दिनकर भागवत गोरे, पुरुषोत्तम सुदाम जगताप, बालाजी वामन वाघमारे, भगवान भानूदास वाघमारे, शरफोद्दीन हाशमोद्दीन मुजावर, रिहान रिवाज कुरेशी, मतीन खाजा कुरेशी, अक्षय सुदाम शिंदे, सचिन सुभाष बागल, बाळासाहेब नामदेव वाघमारे, तुषार सुदाम शिंदे, धनु ऊर्फ धनेश हरी जाधव (डीजे), अक्षय गणेश जाधव, अजय लक्ष्मण पवार, अतुल सिद्धू माने, सुनील चांगदेव मगर, शिवाजी ऊर्फ सोन्या राजेंद्र खंबायत, गणेश ऊर्फ भैय्या जाधव, रणजित दिलीप माने, अंकुश ज्ञानदेव माने, नितीन माने, राहुल सिद्धू माने, सागर सिद्धू माने, सिद्धू मारुती माने, संजय चांगदेव शिंदे, विशाल चांगदेव शिंदे, किरण अर्जुन सोनवणे, दीपक प्रवीण चौतमहाल, सत्यम बुवा बनसोडे, तुषार आण्णा कांबळे, राजन प्रफुल चौतमहाल, कुणाल पोपट अहिरे, बुद्धभूषण बसवंत, साजन ऊर्फ आकाश महेंद्र बनसोडे, राहुल अशोक चौतमहाल, प्रवीण श्रीधर वाघचौरे, राहुल मिलिंद बसवंत, नसीम अहेमद पठाण, नदीम गफार पठाण, अरबाज ईनायत पठाण, सरवर साबेर पठाण, फयाज बुरानुद्दीन पठाण, दयानंद शंकर जाधव, अशोक उत्रेश्वर जाधव, अभिजीत विष्णू देडे, गणेश नवनाथ गुंजाळ, हनुमंत हरीदास सुतार, विद्या मोहन पवार, अभिजीत रामा गोरे, विलास सुबान दाभाडे, अर्जुन भीमराव भांड, राहुल लाला चौधरी, सतीश पप्पन कारकर, अमोल कचरू भोसले, महादेव रावसाहेब वाघमारे, राजू सलीम सौदागर, नवनाथ रामभाऊ चौधरी, सुरेश सरदार काळे, भारत बब्रुवान गवारे, विकास गुलाब माळी, कमल किसन काळे, सुमन दिगंबर काळे, संतोष चंद्रकांत गगणे, सावित्राबाई सुनील काळे, दत्तात्रय दगडू पाटील/डांगे आदी.
हद्दीत आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
हद्दपार करण्यात आलेले हे इसम २५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत धाराशिव, तुळजापूर अथवा परंडा तालुक्यांच्या हद्दीत कुठेही आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
सदरची धडक प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर, तुळजापूर, धाराशिव शहर, बेंबळी आणि परंडा पोलीस ठाण्यांचे सर्व प्रभारी अधिकारी व पोलीस हवालदार दयानंद गाडेकर यांनी पार पाडली.





