• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

admin by admin
October 15, 2026
in सडेतोड
Reading Time: 1 min read
 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा मंगल सोहळा सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि परराज्यांतून पायी चालत, अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हातान्हाची पर्वा न करता लाखो निष्पाप भाविक आईच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होत आहेत. हातात नवसाचे नारळ आणि मुखात ‘आई राजा उदो उदो’चा गजर करत सामान्य कष्टकरी, शेतकरी, मायमाऊल्या दर्शनासाठी तब्बल नऊ ते दहा तास रांगेत तिष्ठत उभ्या आहेत. पायाला फोड आले तरी एका क्षणाच्या दर्शनासाठी डोळे ताणून उभे राहणाऱ्या या भोळ्याभाबड्या भक्तांच्या वाट्याला पोलिसांचे लाठीमार, प्रशासनाचा उद्धटपणा आणि तुडवून काढणारी गर्दी येते. पण याच मंदिराच्या गाभाऱ्यात दुसरीकडे काय चालले आहे? तर ज्यांचे काळे धंदे समाज पोखरत आहेत, ज्यांच्यावर गुन्हे आणि तडीपारीची प्रकरणे नोंद आहेत, त्या कुख्यात ‘मटका किंग’साठी लाल गालिचे अंथरले जात आहेत! सराईत गुन्हेगारांना देवीच्या गर्भगृहात थेट व्हीआयपी प्रवेश दिला जातो आणि त्यांच्यासोबत आमदारांचे खाजगी सचिव हसतमुखाने फोटो काढताना दिसतात. याहून मोठा द्रोह, अधर्म आणि निर्लज्जपणाचा नमुना तो कोणता असू शकतो?

‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’ने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रार दाखल करून या महापापाचा बुरखा टराटरा फाडला आहे. सोलापूरचा सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मटका बुक्कीमालक अरुण रोडगे उर्फ दादा रोडगे याला थेट गाभाऱ्यात नेऊन व्हीआयपी दर्शन घडवले जाते. हे कृत्य कोणाच्या मेहेरबानीने झाले, याचे पुरावे आता चव्हाट्यावर आले आहेत. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खाजगी सचिव सुधीर (सुजित) जमदाडे, महंत आणि काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने हा नियमबाह्य खेळ रंगला आहे. फक्त मटका किंगला गाभारात सोडण्यापुरते हे प्रकरण मर्यादित नाही; तर आमदारांच्या कोट्यातील व्हीआयपी पासेस आणि मंदिरातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘चरणतीर्थ’ व ‘प्रक्षाळ पूजे’चे बनावट पासेस छापून ते परराज्यातील धनदांडग्यांना विकून लाखो रुपयांचा काळाबाजार करण्याचे रॅकेटच सुरू असल्याचा घणाघाती आरोप आहे.

देवीच्या चरणी भक्ती नव्हे, तर पैशांचा बाजार मांडला गेला आहे. आमदार महोदयांच्या अधिकारातील व्हीआयपी पासेस काळ्या बाजारात विकण्याची हिंमत एका खाजगी सचिवामध्ये एका रात्रीत कशी काय येऊ शकते? या आर्थिक गैरव्यवहाराच्या मलईची चव कुणाकुणाच्या जिभांपर्यंत पोहोचली आहे? सामान्य भाविक पाण्यासाठी वणवण फिरत असताना, रात्रीच्या आरतीनंतर बेकायदेशीरपणे १५-२० श्रीमंतांना गाभाऱ्यात सोडून संस्थान आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे हे दलाल कोणाच्या सावलीत फोफावले, याचे उत्तर मिळायलाच हवे. भारतीय न्याय संहितेनुसार ही उघड उघड फसवणूक, संस्थानाच्या सुरक्षेशी केलेली अक्षम्य तडजोड आणि देवीच्या ऐतिहासिक मौल्यवान अलंकारांना धोक्यात घालणारे गुन्हेगारी कृत्य आहे.

या सर्व प्रकरणावर आमदार राणा पाटील यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया म्हणजे निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. स्वतःचा उजवा हात, स्वतःचा खासगी सचिव या महाघोटाळ्यात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेला असताना, दिल्लीत बसून ‘मी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत’ अशी प्रसिद्धीपत्रके वाटणे म्हणजे स्वतःचे कातडे वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. आदेश कोणाला दाखवता? ज्या सचिवाच्या खांद्यावर हात ठेवून मटका किंग गाभाऱ्यात शिरला, त्या सचिवाला मंदिराच्या कारभारात आणि तुमच्या कार्यालयात कशासाठी बाळगले आहे? जर आमदार महोदयांचे हात खरोखरच स्वच्छ असतील, तर त्यांनी केवळ वृत्तपत्रीय हवाबाजी न करता आपल्या लाडक्या पीएवर, बनावट पास विकणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करण्याचे लेखी आदेश पोलिसांना का दिले नाहीत? ते अधिकृत चौकशीचे पत्र अजून जनतेसमोर का आले नाही?

मंदिर संस्थानच्या निर्णयप्रक्रियेत आणि विश्वस्त व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी महत्त्वाच्या खुर्च्यांवर बसले आहेत. ज्यांच्यावर व्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच दावणीला बांधलेली माणसे मंदिराचे पावित्र्य गुन्हेगारांच्या पायाशी लोळवत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची केवळ ‘दिखाऊ चौकशी’ करून चालणार नाही. १४ ऑक्टोबरच्या रात्रीचे तसेच नवरात्रोत्सवातील गर्भगृह आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तात्काळ जप्त करून त्याचा फॉरेन्सिक तपास झाला पाहिजे. बनावट पासेसचे रॅकेट चालवणाऱ्या प्रत्येकाची गचांडी धरून त्यांना गजाआड केले पाहिजे.

नैतिकतेचा आव आणणाऱ्या आमदारांनी आता पोकळ धमक्या देणे बंद करावे. आपल्या घरातलाच दिवा जर मंदिराला आग लावत असेल, तर त्या आगीची जबाबदारी आमदारांना झटकता येणार नाही. कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा हा जो क्रूर बाजार मांडला गेला आहे, त्याची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आधी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मग निष्पक्ष चौकशीला सामोरे जावे. सामान्य भाविकांचे अश्रू आणि तुळजाभवानीचा कोप सत्ताधाऱ्यांच्या या भ्रष्ट अहंकाराला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, हे प्रशासनाने आणि त्यांच्या राजकीय पाठीराख्यांनी पक्के ध्यानात ठेवावे!

  • सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह
Previous Post

‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?

Next Post

उमरगा : मौलाना आझाद चौकात टोळक्याचा राडा; मित्राच्या भावाला धक्काबुक्कीचा जाब विचारल्याने तरुणावर काठ्या-दगडांनी हल्ला

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : मौलाना आझाद चौकात टोळक्याचा राडा; मित्राच्या भावाला धक्काबुक्कीचा जाब विचारल्याने तरुणावर काठ्या-दगडांनी हल्ला

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर ‘मटका किंग’ व्हीआयपी दर्शन प्रकरण: धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित

तुळजाभवानी मंदिर ‘मटका किंग’ व्हीआयपी दर्शन प्रकरण: धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित

October 16, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणूक : १८ वर्षांच्या कार्यकाळाचा हिशोब मांडत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना संधी देण्याचे आवाहन

मराठवाडा पदवीधर निवडणूक : १८ वर्षांच्या कार्यकाळाचा हिशोब मांडत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना संधी देण्याचे आवाहन

October 16, 2026
साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘किमान मला तरी विचारा’ म्हणणाऱ्या राणा पाटलांना थेट सवाल: हातच्या कंकणाला आरसा कशाला?

October 15, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मध्यरात्री इनोव्हा कारमधून गावठी कट्टा व काडतूस जप्त; तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई

October 15, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग : वसंत नगरातील श्री जगदंबा देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातून ७५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

October 15, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर ‘मटका किंग’ व्हीआयपी दर्शन प्रकरण: धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित
  • मराठवाडा पदवीधर निवडणूक : १८ वर्षांच्या कार्यकाळाचा हिशोब मांडत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना संधी देण्याचे आवाहन
  • ‘किमान मला तरी विचारा’ म्हणणाऱ्या राणा पाटलांना थेट सवाल: हातच्या कंकणाला आरसा कशाला?
  • तुळजापूर : मध्यरात्री इनोव्हा कारमधून गावठी कट्टा व काडतूस जप्त; तुळजापूर पोलिसांची धडक कारवाई
  • नळदुर्ग : वसंत नगरातील श्री जगदंबा देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातून ७५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!