• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, November 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत धाराशिवमध्ये व्यक्तीला तीन दिवस डांबले

९.७० लाखांच्या व्यवहाराचे बॉण्ड पेपरवर सह्या घेतल्याचा आरोप

admin by admin
November 4, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It
धाराशिव : मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत एका व्यक्तीला घरी नेऊन सलग तीन दिवस डांबून ठेवले. त्याला मारहाण करून वडिलोपार्जित शेतीच्या नावावर ९ लाख ७० हजार रुपये दिल्याचे बॉण्ड पेपरवर नमूद केले. तसेच कोणतीही माहिती न देता वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित झेंडे आणि राणा झेंडे (दोघे रा. धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी दिलीप विठ्ठलराव काळे (वय ५२, रा. शिवली, ता. औसा, जि. लातूर) हे १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून धाराशिव बसस्थानकाजवळील रस्त्याच्या चौकात होते. यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा फायदा घेत आरोपींनी त्यांना स्वतःच्या घरी नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर आरोपींनी त्यांना घरात सलग तीन दिवस डांबून ठेवून मारहाण केली. त्यांच्या मालकीच्या शेतीची माहिती काढून घेतली. संबंधित जमीन वडिलोपार्जित असतानाही आरोपींनी फिर्यादीला वेळोवेळी एकूण ९ लाख ७० हजार रुपये रोख दिल्याचे बॉण्ड पेपरवर नमूद केले.

याशिवाय, कोणतीही माहिती न देता वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या मुलालाही शिवीगाळ करून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी दिलीप काळे यांनी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमित झेंडे आणि राणा झेंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२७(७), ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३१८(४), ३५१(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करीत आहेत.

 

 

Previous Post

रस्ता अडवून २० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; चौघांविरुद्ध वाशी पोलिसांत गुन्हा

Next Post

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापूर अमीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापूर अमीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

November 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत धाराशिवमध्ये व्यक्तीला तीन दिवस डांबले

November 4, 2026

Recent Posts

  • तुळजापूर अमीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास
  • धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
  • उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  • मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत धाराशिवमध्ये व्यक्तीला तीन दिवस डांबले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!