• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उजनीच्या पाण्याने तुळजाभवानी मंदिराच्या पायर्‍यांची केली स्वच्छता

उजनी धरणाच्या पाण्यासाठी अण्णासाहेब दराडे यांची अनोखी मोहीम

admin by admin
September 5, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
उजनीच्या पाण्याने तुळजाभवानी मंदिराच्या पायर्‍यांची केली स्वच्छता
0
SHARES
569
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव– दुष्काळी धाराशिव जिल्ह्यात वर्षानुवर्षे आस लागून राहिलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पांतर्गत उजनी धरणाचे पाणी अद्याप मिळालेले नाही. याअनुषंगाने अण्णासाहेब दराडे यांनी गुरुवारी (दि.५) श्री तुळजाभवानी मंदिरात उजनी धरणातील पाणी टँकरने आणून स्वच्छता करून अनोखे आंदोलन केले.

धाराशिव जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. सततच्या दुष्काळामुळे आणि नापिकीमुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळेच देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत धाराशिव जिल्हा कायम तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास शेतीला चांगले दिवस येतील अशा आशेवर येथील शेतकरी जगत आहेत. परंतु, गेल्या तीन दशकापासून कृष्णा खोर्‍यातील पाणी अद्याप शेतकर्‍यांना मिळालेले नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अण्णासाहेब दराडे यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरातील पायर्‍यांची उजनी धरणातील पाणी टँकरने आणून स्वच्छता केली. तसेच, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मारुती मंदिरामध्ये उजनी धरणातील पाण्याने अभिषेकपूजा करणार असल्याचे यावेळी अण्णासाहेब दराडे यांनी सांगितले.

दरम्यान, तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात अण्णासाहेब दराडे यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ मुक्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शेतकर्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून श्री.दराडे यांनी गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या प्रश्नावर तसेच शासकीय कार्यालयांमध्ये होणारी सर्वसामान्यांची पिळवणूक रोखण्यासाठी आणि नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

यावेळी संभाजी भोसले, प्रा.राम घुगे, महेश पाटील, अभिमान दराडे, अंबादास घुगे, नितीन लोभे, जोतीराम मोजगे, गणेश घुगे, केशव शिवले यांच्यासह नागरिक, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात घरफोडी आणि मोटर चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

धाराशिव : मोटारसायकल चोरीच्या टोळीचा पर्दाफाश

Next Post
धाराशिव : मोटारसायकल चोरीच्या टोळीचा पर्दाफाश

धाराशिव : मोटारसायकल चोरीच्या टोळीचा पर्दाफाश

ताज्या बातम्या

बार्शी-बोरफळ रस्त्याचा चिखल, लाडक्या कंत्राटदाराची पाठराखण अन् साहेबांचे ‘पाहणीचे नाटक’!

बार्शी-बोरफळ रस्त्याचा चिखल, लाडक्या कंत्राटदाराची पाठराखण अन् साहेबांचे ‘पाहणीचे नाटक’!

August 1, 2026
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरणाला नवे वळण; FIR, खुलासा आणि विलंबावर ऍड. शीतल चव्हाण यांचे गंभीर सवाल

August 1, 2026
येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरुम पोलिसांची हायवेवर धडक कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ९ जनावरांची सुटका

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात खिरणीमळा येथे पोलिसांचा छापा! कत्तलीसाठी डांबलेल्या २ गोवंशीय गायींची सुटका

August 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!