• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, परंडा आणि कळंब पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
September 26, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
98
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. परंडा, कळंब येथे घडलेल्या वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • परंडा येथे घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी

परंडा येथील विद्यानगरमध्ये राहणाऱ्या दयानंद शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २२ तोळे सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ८,००० रुपये रोख असा एकूण ६ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० ते २:३० या वेळेत घडली.

फिर्यादी नामे- दयानंद विश्वंभर शिंदे, वय 59 वर्षे, रा.विद्यानगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांचे राहते  घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 25.09.2024 रोजी 12.30 ते 02.30 वा.सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील बेडरुममधील कपाटातील 22 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम 8,000₹असा एकुण 6,86,500 ₹किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दयानंद शिंदे यांनी दि.25.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(3), 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  • कळंब येथे शेतजमिनीवरील कृषीपंप चोरी

कळंब येथील वैभवराज फाटक यांच्या शेतजमिनीवरील ४५ हजार ३५० रुपये किमतीचा सौर कृषीपंप आणि विद्युत पंप २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपासून २४ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरीला गेला.

फिर्यादी नामे-वैभवराज केशवराज फाटक, वय 47 वर्षे, रा.देवी रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे कळंब शिवारातील शेत सर्वे नं 32 व 36 मधील 5 एचपी ची जीके कंपनीची स्टील बॉडी असलेला सौर कृषीपंप,210 फुट वायर व एच पी एवेन विद्युत पंप असा एकुण45, 350₹किंमतीचा माल  हा दि. 23.09.2024 रोजी 19.00 वा. सु. ते दि. 24.09.2024 रोजी 05.0 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वैभवराज फाटक यांनी दि.25.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  • परंडा येथे शेतजमिनीवरील सोयाबीन चोरी

परंडा तालुक्यातील टाकळी येथील रामभाउ भोरे यांच्या शेतजमिनीवरील अंदाजे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे ३२ क्विंटल सोयाबीन २२ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान चोरीला गेले. या प्रकरणी काही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी नामे-रामभाउ विश्वनाथ भोरे, वय 55वर्षे, रा.टाकळी ता. परंडा जि. धाराशिव यांचे टाकळी शिवारातील शेत गट नं 117 मधील सोयाबीन 32 क्विंटल अंदाजे 1,60,000₹ किंमतीचे आरोपी नामे- गणपती भाउराव भोरे, सुर्यकांत भाउराव भोरे, कृष्णा गणपती भोरे, रशिका शंकर भोरे, जयश्री गणपती भोरे, सर्व रा.टाकळी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 22.09.2024 रोजी 11.00 ते दि. 23.9.2024 रोजी चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रामभाउ भोरे यांनी दि.25.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव येथे महिलेवर हल्ला, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव शहरासाठी २३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

Next Post
धाराशिव शहरासाठी २३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

धाराशिव शहरासाठी २३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

ताज्या बातम्या

येडेश्वरी मंदिर परिसरात पुन्हा ‘टायगर गेम’चा सुळसुळाट; इन्स्टाग्राम रीलमुळे पोलिसांचा दावा फोल

येडेश्वरी मंदिर परिसरात पुन्हा ‘टायगर गेम’चा सुळसुळाट; इन्स्टाग्राम रीलमुळे पोलिसांचा दावा फोल

April 28, 2026
‘कर्मचाऱ्यांवर दबाव आणाल, तर थेट गुन्हे दाखल करू’ – मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले खडे बोल

‘कर्मचाऱ्यांवर दबाव आणाल, तर थेट गुन्हे दाखल करू’ – मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले खडे बोल

April 28, 2026
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

“तुतारी आणि कमळात ‘पाइपलाइन’ फुटली? धाराशिव नगरपालिकेत ‘छुप्या संसारा’त वादाची ठिणगी!”

April 28, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

‘दारू पाज’ म्हणत तरुणाला बियरच्या बाटलीने मारहाण; खामसवाडी येथील घटना

April 28, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर पाच वर्षे लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

April 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group