धाराशिव : धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक एम.के. काझी यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काझी यांनी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ चे कलम ८ व ९ अन्वये गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
धाराशिवचे नायब तहसीलदार घृष्णेश्वर शिवानंद स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काझी यांनी धाराशिव तहसील लिपिक असताना त्यांच्या कार्यकालात (१३/०६/२०१८ ते ०७/०१/२०१९) काही जमीन व्यवहाराच्या संचिका गहाळ केल्या आहेत. मौजे घाटँग्री येथील एका जमिनीच्या व्यवहाराची आणि फेरफरची नोंदीची संचिका माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब वसंत सुभेदार यांनी मागितली होती. मात्र, सदर संचिका कार्यालयात सापडल्या नाहीत.
याप्रकरणी काझी यांना नोटीस बजावण्यात आली असता, काझी खुलासा असमाधानकारक असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.