धाराशिव विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळे यांचा जवळपास 36566 हजार मतांनी पराभव केला. राज्यात महायुतीची सुनामी असतानाही हा विजय लक्षवेधी ठरला आहे.
अंतिम मतमोजणी निकाल:
मतमोजणीच्या सर्व ३० फेऱ्या संपल्या तेव्हा आ. कैलास पाटील यांना130573 मते मिळाली, तर अजित पिंगळे यांना 94007 मते मिळाली.
विजयाच्या कारणांचा घेतलेला आढावा:
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळे हे भाजपचे कळंब तालुकाध्यक्ष होते. त्यांच्यावर ‘आयात उमेदवार’ असल्याचा शिक्का होता, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. मुस्लिम आणि मराठा मतदारांनी एकगठ्ठा पाठींबा दिल्याने आ. कैलास पाटील यांचा विजय सुकर झाला.
आ. कैलास पाटील यांचा हा विजय फक्त धाराशिवच नव्हे, तर राज्यभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
धाराशिव लाइव्हचे भाकीत खरे ठरले !
धाराशिव मतदारसंघातून आ. कैलास पाटील हे विजयी होणार, असे भाकीत धाराशिव लाइव्हने व्यक्त केले होते. हे भाकीत खरे ठरले आहे.