धाराशिव – धाराशिव शहरात मागील भांडणाचे कारणावरून तीन वेगवेगळ्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या असून, त्यानुसार धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिली घटना जुना बस डेपोच्या पाठीमागे २५ नोव्हेंबर रोजी घडली. नुरमहमद मुस्तफा शेख यांना इरफान ईस्माईल शेख, तौसिफ शकिल शेख, आयजु नाईकवाडी आणि इतर एका इसमाने मारहाण केली. आरोपींनी शेख यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी नामे-इरफान ईस्माईल शेख, तौसिफ शकिल शेख, आयजु नाईकवाडी, इतर एक इसम सर्व रा. जुना बस डेपो च्या पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.25.11.2024 रोजी 19.30 वा. सु. जुना बस डेपो च्या पाठीमागे नगर परिषद शाळेजवळ धराशिव येथे फिर्यादी नामे-नुरमहमद मुस्तफा शेख, वय 33 वर्षे, रा. जुना बस डेपो च्या पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नुरमहमद शेख यांनी दि.27.11.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(1),352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी घटना खानापूर येथे २७ नोव्हेंबर रोजी घडली. रुपाली गुणवंत मगर यांना प्रदीप प्रकाश मगर, मनिषा प्रदीप मगर, विजूबाई प्रकाश मगर आणि प्रकाश श्रीरंग मगर यांनी मारहाण केली. आरोपींनी मगर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी नामे-प्रदीप प्रकाश मगर, मनिषा प्रदिप मगर, विजूबाई प्रकाश मगर, प्रकाश श्रीरंग मगर सर्व रा. खानापूर ता. जि. धाराशिव यांनी दि.27.11.2024 रोजी 07.00 वा. सु. खानापुर येथे फिर्यादी नामे-रुपाली गुणवंत मगर, वय 31 वर्षे, रा. खानापूर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणवरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रुपाली मगर यांनी दि.27.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2) 352, 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तिसरी घटना सुद्धा खानापूर येथे २७ नोव्हेंबर रोजी घडली. मनिषा प्रदीप मगर यांना गुणवंत बलभिम मगर आणि रुपाली गुणवंत मगर यांनी मारहाण केली. आरोपींनी मगर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी नामे-गुणवंत बलभिम मगर, रुपाली गुणवंत मगर रा. खानापूर ता. जि. धाराशिव यांनी दि.27.11.2024 रोजी 08.00 वा. सु. खानापुर येथे फिर्यादी नामे-मनिषा प्रदीप मगर, वय 35 वर्षे, रा. खानापूर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणवरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मनिषा मगर यांनी दि.27.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115,352, 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तिन्ही घटनांमध्ये जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, धाराशिव शहर पोलिसांनी भादंवि कलम ११८(१), ११५, ३५२, ३(५) अन्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.