परंडा – परंडा येथील बसस्थानकावर आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादात एका ४० वर्षीय व्यक्तीला काचेच्या बाटलीने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण दशरथ खडके (वय ४०, रा. माळी गल्ली, परंडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भैय्या अर्जुन सोनवणे आणि सौरव बनसोडे या दोघांनी ४ जानेवारी २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकावरील त्यांच्या पान टपरीसमोर आर्थिक व्यवहारावरून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून काचेच्या बाटलीने वार केले. यात ते जखमी झाले. तसेच आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी परंडा पोलिसांनी भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.