धाराशिव : आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शितल ज्ञानदेव डोंबाळे (रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) या महिला दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.५० वाजता बसस्थानकावरून प्रभात सहकारी पतपेढी येथे कामासाठी जात असताना यशदा मल्टीस्टेट, नाईकवाडी नगर, धाराशिव समोर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या खिशातील विवो वाय ५६ कंपनीचा मोबाइल चोरून नेला. या मोबाईलची किंमत अंदाजे १०,००० रुपये आहे.
याप्रकरणी शितल डोंबाळे यांनी दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३७९ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.