धाराशिव: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी धाराशिवमध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चा प्रचंड चर्चेत आला. मोर्च्याची हवा तर आधीच जोरात होती, पण या सभेतील भाषणांनी ती वादळात रूपांतरित केली.
यावेळी आ. सुरेश धस यांनी आपल्या खास शैलीत मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष पण रोखठोक टीका केली. “दाल मी कुछ काला है!” या वाक्याने त्यांनी सभा जिंकलीच, पण धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांचा “ड्रग्ज तस्करांसोबतचा फोटो” दाखवत त्यांनी “साबूत के साथ तडका” दिला.
पीक विम्याचा घोटाळा की ‘हनुमानाची’ नवीन लीला?
धस साहेबांचा आरोप काही साधासुधा नव्हता. परळीतील “हनुमानाने” धाराशिवमध्ये 3,000 हेक्टर जमिनीचा पीक विमा भरण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटले, असं त्यांनी सांगितलं. “शेतकऱ्यांच्या नावाने बोगस क्लेम दाखवून पैसे खाल्ले जात आहेत,” असा स्फोटक आरोप करत धस यांनी जमलेल्या जनसमुदायाची वाहवा मिळवली.
एसपी कोण? चर्चा सुरूच!
सुरेश धस यांनी धाराशिवच्या एसपींवरही आरोप केला की, “त्यांचे आरोपींसोबत लागेबांधे आहेत.” एसी साहेब हे वागणं बरं नव्हं.दाल मी कुछ काला है अशी टीकेची झोड उठवली. आता गंमत अशी की, जेव्हा घोटाळा उघडकीस आला, तेव्हा अतुल कुलकर्णी एसपी होते, आणि सध्या संजय जाधव आहेत. त्यामुळे “धस साहेबांचा बोट दाखवायचा हेतू कोणाकडे?” याची चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.
टीकेचा तडका, पण रस्सा थोडा गोंधळात!
सर्वसामान्य जनतेसाठी हा मोर्चा न्यायासाठी होता, पण राजकीय नेत्यांसाठी तो “मसालेदार आरोपांचा” मंच ठरला. सुरेश धस यांच्या “दाल मी कुछ काला है” या वक्तव्याने मोर्चाला अजूनच रंगत आणली, पण “दाल पचवायला” अजूनही वेळ लागेल, असं दिसतंय!
धाराशिवचे नागरिक मात्र या सर्व प्रकाराकडे “आता पुढे काय?” या प्रश्नाने पाहत आहेत. मंत्री-मंडळींच्या वादातून सत्य बाहेर येईल की हे फक्त राजकीय ‘ड्रामा’ राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!
संपूर्ण भाषण ऐका