• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये पालकमंत्री, ओमराजेंचं स्मितहास्य आणि शिवसैनिकांचा गोंधळ!

Video

admin by admin
January 27, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
तानाजी सावंतांच्या नाराजीचा ‘धाराशिव’ कट्टा!
0
SHARES
2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाल्यानंतर राजकीय रंगमंचावर एकच हलचल झाली आहे. तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून गच्छंती झाल्यावर मुंबईकर प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सरनाईक धाराशिव दौऱ्यावर आले आणि येथेच राजकीय नाटकाचे नवीन पर्व सुरू झाले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार तानाजी सावंत यांनी अनुपस्थिती दाखवली, तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी सरनाईक यांच्यासोबत गप्पा, हास्यविनोद करून वेगळाच संदेश दिला.

त्यातच ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणार असल्याच्या अफवांमुळे वातावरण अधिकच तापलं. खासदार ओमराजेंना महायुतीत येणार का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी केवळ स्मितहास्य दिलं. सरनाईक यांनी लगेचच “ओमराजे महायुतीचेच” असल्याचा दावा केला, त्यामुळे चर्चेला उधाण आलं.

दुसरीकडे, आमदार कैलास पाटील यांनी मात्र हा दावा धुडकावून लावत, “उद्धव ठाकरेंसोबतच होतो, आहोत आणि राहणार!” असा ठाम निर्वाळा दिला. संघर्ष करत शिवसेना मजबूत करण्याचा मंत्र देत त्यांनी चर्चेचा नवा पट उघडला.

आता शिवसैनिकांना प्रश्न पडला आहे, “ओमराजे स्मितहास्य करत कोणता डाव मांडत आहेत?” आणि “सरनाईकांचे हास्य म्हणजे महायुतीचा विजय की नव्या गोंधळाची सुरुवात?” धाराशिवच्या राजकीय रंगमंचावर पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Video 

Previous Post

तानाजी सावंतांच्या नाराजीचा ‘धाराशिव’ कट्टा!

Next Post

नळदुर्ग बायपास सुरू; ‘यमचा रस्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमरस्त्यावरून अपघातांचे सत्र थांबणार?

Next Post
नळदुर्ग बायपास सुरू; ‘यमचा रस्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमरस्त्यावरून अपघातांचे सत्र थांबणार?

नळदुर्ग बायपास सुरू; 'यमचा रस्ता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमरस्त्यावरून अपघातांचे सत्र थांबणार?

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group