मुरुम :मयत नामे-सुभाष ज्योतीबा रणखांब, वय 73 वर्षे, रा. कडदोरा, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 25.10.2023 रोजी 19.15 वा. सु. कडदोरा ते सास्तुर रोडवर मयताचे शेताजवळ कडदोरा शिवार ता. उमरगा येथुन पायी चालत गावाकडे जात होते. दरम्यान बोलेरो जिप क्र एमएच 12 आरटी, 5825 चा चालक नामे भिमराव विठ्ठल सुरवसे, रा. कडदोरा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील बोलेरो ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून सुभाष रणखांब यांना धडक दिली. या अपघातात सुभाष रणखांब हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी फुलचंद सुभाष रणखांग, वय 45 वर्षे, रा. कडदोरा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी :मयत नामे-1) प्रविण कल्याण साळुंके, वय 08 वर्षे, 2) कन्हैय्या कल्याण साळुंके रा. विजोरा ता. वाशी जि. धाराशिव हे दोघे दि. 08.10.2023 रोजी इजोरा येथे पाण्याची टाकीचे बांधकाम करणारा अज्ञात गुत्तेदार यांनी सार्वजनिक जागी हायगई व निष्काळजी पणे खड्डा खोदुन ठेवल्याने त्या खड्यात पाणी साचल्याने प्रविण व कन्हैय्या हे त्या खड्यात पडून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी महादेव संभाजी वाघमारे, वय 32 वर्षे, रा. इजोरा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.28.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :मयत नामे-वसुदेव रंगनाथ चव्हाण, वय 75 वर्षे, रा. धानोरे(द), ता. बार्शी जि. सोलापूर हे दि. 29.08.2023 रोजी 10.30 वा. सु. बोर्डा गावाचे पाटीवर बसची वाट पाहात उभा होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 जे 2961 चा चालक नामे मारुती रामकिसन कांबळे, रा. वाघोली, ता. कळंब जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून वसुदेव चव्हाण यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात वसुदेव चव्हाण हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी महेश लक्ष्मण चव्हाण, वय 30 वर्षे, रा. धानोरे(द), ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.28.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.