बेंबळी – करजखेडा आठवडी बाजार परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेसाठी ठेवलेले 5.74 लाख रुपये किंमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
ही चोरी 26 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घडल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरीस गेलेल्या पाईपांमध्ये वेल्सपन डीआय पाईप कंपनीचे 150 मिमी व्यासाचे 35 पाईप (5.5 मीटर लांबीचे) आणि 100 मिमी व्यासाचे 30 पाईप (5.5 मीटर लांबीचे) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी राजाभाऊ शिवाजी गडकर (वय 60, रा. रामनगर लक्ष्मी कॉलनी, धाराशिव) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून भा.न्या.सं.कलम 303(2) (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चोरीला गेलेल्या पाईपांचा शोध घेण्यासाठी पुढील अन्वेषण सुरू आहे.
उमरग्यात रिक्षात प्रवास करताना सोनसाखळी चोरी
उमरगा – रिक्षातून प्रवास करत असताना दोन अनोळखी महिलांनी प्रवासी महिलेची 1.40 लाख रुपये किंमतीची सोन्याची दागिने असलेली बॅग लांबवली, अशी घटना समोर आली आहे.
श्वेता ज्ञानेश्वर जाधव (वय 25, रा. होळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) या 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 ते 4.30 वाजण्याच्या दरम्यान नारंगवाडी पाटी ते एकोंडीवाडी या मार्गावर रिक्षाने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. अनोळखी दोन महिलांनी त्यांच्या बॅगेतील 5 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, भा.न्या.सं.कलम 303 (2) (चोरी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस पुढील तपास करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.







