मुरुम – उमरगा तालुक्यातील आलुर येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीस विनाकारण शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडाने मारहाण केल्याची घटना १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौलाली गुलाब शेख (वय ५५, रा. आलुर) हे १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २.४५ ते ३.०० च्या सुमारास धनगर गल्लीमधील रस्त्यावर असताना आरोपी रत्नाकर हणुमंत शिंगे, शुभम रत्नाकर शिंगे, सोन्या अशोक लोखंडे, शरणापा दौलु वस्के (सर्व रा. आलुर, ता. उमरगा) यांनी त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडाने मारहाण करत गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे, तर त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.
याप्रकरणी मौलाली शेख यांनी १९ फेब्रुवारी रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी भा.दं.वि. कलम ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुरुम पोलीस करीत आहेत.