धाराशिव – आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना धाराशिव येथे घडली आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी किरण सोनवणे (वय ४६, रा. भिमनगर, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ते तहसीलकडे जात असताना सतिश सरडे, शंभु सतिश सरडे, जयश्री सतिश सरडे (सर्व रा. हाडको तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी त्यांना आर्थिक व्यवहारावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी व लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. इतकेच नव्हे तर जिवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेची तक्रार सोनवणे यांनी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सतिश सरडे, शंभु सतिश सरडे, जयश्री सतिश सरडे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352, 351(2) (3),3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.