धाराशिव : कोर्टातील केस काढून घेण्यासाठी व ट्रॅक्टर नावावर करण्यासाठी एका व्यक्तीला मारहाण करून औषध पाजल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता धाराशिव तालुक्यातील कौडगाव तांड्याजवळ घडली.
आकाश माणिक राठोड (वय 32, रा. तांबेवाडी तांडा, ता. बाशी, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महादेव अरुण मदने, विक्रम अरुण मदने (दोघे रा. भातणर्बा, ता. बार्शी, जि. सोलापूर), रेखा सुनील चव्हाण आणि मारुती बाबुराव राठोड यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि काहीतरी औषध पाजले. या मारहाणीत आकाश राठोड जखमी झाले आहेत.
फिर्यादी आकाश राठोड यांनी 2 फेब्रुवारी 2025 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 118(1), 126(2), 115(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.