धाराशिव– राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे-पाटील यांच्या घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या तीन आरोपीविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ.मनीषा राखुंडे-पाटील ह्या तिरुपती येथे असताना त्यांच्या धाराशिव येथील राहत्या घरी दत्ता मोहन तुपे, नितीन मस्के, मनीषा मस्के यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलीला व जावई यांना धक्काबुक्की केली. तसेच घरासमोरील सौ.राखुंडे-पाटील यांच्या गाडीची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
आरोपी नामे-1) दत्ता मोहन तुपे, रा. येडशी ता. जि. धाराशिव, 2) नितीन मस्के, 3) मनिषा मस्के, दोघे रा. एमआयडीसी म्हाडा कॉलनी धाराशिव यांनी दि. 16.04.2024 रोजी 20.30 ते 20.45 वा. सु. एमआयडीसी म्हाडा कॉलनी येथील मनिषा पाटील यांचे घरासमोर फिर्यादी नामे-राजनंदिनी सागर शिंदे, वय 22 वर्षे, रा. वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी विनाकारण घरासमोरील गाड्यांचे काचा फोडून नुकसान करुन फिर्यादी व फिर्यादीचे पती यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे गळ्यातील चैन हिसकावून घेवून फिर्यादीची मावशी मंजुशा व मनिषा यांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राजनंदिनी शिंदे यांनी दि.17.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 325, 323, 327, 427, 504, 506, 509, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.