धाराशिव: सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकांवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीवर बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11.25 वाजता घडली.
फिर्यादी पोतन्ना पोशेट्टी बहिरोड (वय 57), मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी, यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी रामेश्वर दत्तात्रय सुरवसे (रा. सांगवी, धाराशिव) यांनी शाळेच्या आवारात विनाकारण येऊन फिर्यादीला शिवीगाळ, लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीवर बेंबळी पोलिस ठाण्यात कलम भा.न्या.सं. 132, 121(1), 115(2), 352, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास बेंबळी पोलिस करत असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.