• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेत नांगरण्याच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिनेही लंपास, भूम तालुक्यात खळबळ

admin by admin
May 22, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम: शेत नांगरण्याच्या किरकोळ कारणावरून एका कुटुंबावर लाथाबुक्क्यांनी आणि काठी, खोऱ्याच्या दांड्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कुटुंबातील सदस्यांना गंभीर मारहाण करण्यासोबतच महिलांच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिनेही जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले आहेत. १८ मे २०२६ रोजी सायंकाळी दुधोडी (ता. भूम) येथील गट क्रमांक ३५ च्या बांधावर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिनिनाथ अजिनाथ महानवर (वय ३५, रा. दुधोडी) हे आपल्या शेतात असताना आरोपी अतुल रावण महानवर, संगीता रावण महानवर (दोघे रा. दुधोडी), माऊली संदीपान महानवर (रा. बावी, ता. भूम) आणि बबलू संजय तांबे (रा. हाळगाव, ता. जामखेड, जि. बीड) यांनी त्यांना गाठले. शेत नांगरण्याच्या कारणावरून आरोपींनी मिनिनाथ आणि त्यांच्या आई सिंधुबाई महानवर यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी लाथाबुक्क्यांसह काठी आणि खोऱ्याच्या दांड्याने त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

मिनिनाथ यांचा भाऊ रमेश आणि वहिनी अश्विनी महानवर हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आले असता, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. इतकेच नव्हे, तर भांडणाचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादीच्या वहिनीच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनीगंठण आणि कानातील दीड तोळ्यांचे झुमके जबरदस्तीने ओढून नेले.

या घटनेनंतर मिनिनाथ महानवर यांनी २१ मे २०२६ रोजी भूम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११९(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

कळंब तालुक्यातील कोठाळवाडीत जुन्या वादातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला

Next Post

धाराशिवच्या शांतिनिकेतन कॉलनीत जागेच्या वादातून वृद्ध महिलेला मारहाण; पाच जणांविरुद्ध आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवच्या शांतिनिकेतन कॉलनीत जागेच्या वादातून वृद्ध महिलेला मारहाण; पाच जणांविरुद्ध आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
रेल्वेचा पाठपुरावा सूर्यराजेंचा, अन् ट्रॅकवर ‘सेल्फी’ फेसबुक पिंट्याचा! ‘बोरूबहाद्दरां’चे साहेबांना खुले आव्हान!

रेल्वेचा पाठपुरावा सूर्यराजेंचा, अन् ट्रॅकवर ‘सेल्फी’ फेसबुक पिंट्याचा! ‘बोरूबहाद्दरां’चे साहेबांना खुले आव्हान!

July 10, 2026
धाराशिवच्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला गती; पहिल्या टप्प्यात ₹18.46 कोटींच्या निधीला मंजुरी

धाराशिवच्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला गती; पहिल्या टप्प्यात ₹18.46 कोटींच्या निधीला मंजुरी

July 9, 2026
तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!

July 9, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group