यवतमाळच्या टिपेश्वर जंगलातून तब्बल ५०० किमी प्रवास करून टी-२२ वाघ धाराशिवमध्ये कसा पोहोचला? हे अजूनही गूढ आहे. पण याहून मोठे आश्चर्य म्हणजे, अडीच महिने झाले तरी वन विभागाच्या हाती लागत नाही!
🔥 संतप्त शेतकऱ्यांचा अनोखा निषेध!
वाघाचा धोका वाढत असताना वन विभागाच्या निष्क्रीयतेचा संताप आता उफाळून आला आहे. धाराशिवच्या विभागीय वन अधिकाऱ्यांच्या (D.F.O.) रिकाम्या खुर्चीवर संतप्त शेतकऱ्यांनी ‘बेशरम’ झाड ठेऊन निषेध केला!
📌 कुठे घडला प्रकार?
➡️ हा प्रकार धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत घडला.
➡️ विभागीय वन अधिकारी बी. ए. पौळ हे गैरहजर होते.
➡️ मेडसिंगा येथील शेतकरी मनोज जाधव यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर बेशरम झाड ठेवून देवाकडे वाघ पकडण्याची सुबुद्धी मागितली!
😨 शेतकऱ्यांमध्ये दहशत, वन विभाग ‘कागदी मोहीम’ करण्यात व्यस्त!
➡️ वाघामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला!
➡️ पाळीव जनावरे सतत वाघाच्या हल्ल्याचे बळी पडत आहेत.
➡️ वन विभाग केवळ कागदी मोहीम राबवत आहे, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई नाही!
‘बेशरम’ झाडाचा संदेश – वन विभाग निर्लज्ज?’
बेशरम झाड निर्लज्जपणाचे प्रतीक मानले जाते.
➡️ “वन अधिकारी जबाबदारी घेत नाहीत, म्हणून त्यांना बेशरम झाड अर्पण!”
➡️ संतप्त शेतकऱ्यांनी ‘वाघाला पकडता येत नसेल, तर खुर्ची सोडा!’ असा थेट सवाल केला.
🚨 आता पुढे काय?
टी-२२ वाघ दिवसेंदिवस नवनव्या भागात दिसत आहे, पण वन विभाग केवळ पाहुणचार घेत आहे का?
शेतकऱ्यांचा राग कधी फुटेल आणि हा संताप कुठवर जाईल, हाच खरा प्रश्न!
Video