साफसफाईपेक्षा मोठा घोटाळा साफ करण्याची वेळ आली! माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील ३,२०० कोटींच्या वादग्रस्त टेंडरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
💰 कोट्यवधींच्या टेंडरवर संशयाची छाया!
▪️ ३० ऑगस्ट २०२४ रोजी तानाजी सावंत यांनी पुण्यातील एका खासगी कंपनीला ३,१९० कोटींचे टेंडर मंजूर केले होते.
▪️ यामध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असून, आता त्याची सखोल चौकशी होणार.
▪️ प्रकाश आबिटकर म्हणाले, “अनियमितता आढळल्यास चौकशी होणे गरजेचे आहे. यात कोणत्याही पक्षाचा संबंध नाही!”
🛑 चार्टर फ्लाईट गँगचा प्लॅन फेल!
आरोग्य विभागातील ३ हजार २०० कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली. साफ सफाईच्या कामाचे कंत्राट एका अनुभन नसलेल्यास कंपनीला दिले असल्याने ही स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. ७० कोटी कामासाठी ३२०० कोटी ! याच ३,२०० कोटींच्या टेंडरवरही ब्रेक लागला आहे. सरकारी खजिना लुटण्याच्या प्लानला ‘हवा’ मिळण्याआधीच फुगा फुटला!
आता पुढे काय?
🔹 चौकशी अहवालानंतर पुढील निर्णय होणार
🔹 पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू
🔹 जनतेचा सवाल – “हे पैसे कुणाच्या खिशात जाणार होते?”
सरकार कोणाचंही असो, ‘स्वच्छता मोहीम’ केवळ रस्त्यांपुरती नसून भ्रष्टाचारावरही व्हायला हवी!