धाराशिव – भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांचा वाढदिवस मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने धार्मिक पूजन, सत्कार समारंभ, रक्तदान, अन्नदान, तसेच रुग्णांना फळवाटप यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
तुळजाभवानी मंदीरात महाआरती व प्रसाद वाटप
वाढदिवसानिमित्त तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी महाआरती व महापूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या वतीने भक्तांना गोड प्रसाद वाटप करण्यात आला.
उमरग्यात जंगी सत्कार समारंभ
उमरगा येथे सकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संताजी चालुक्य-पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णांना फळवाटप आणि अन्नदान सेवा
वाढदिवसानिमित्त धाराशिवच्या कुष्ठधाम येथे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण पाठक, जिल्हा सरचिटणीस इंद्रजीत देवकते, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कांबळे, अभय इंगळे यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच, उमरग्यातील इंद्रप्रस्थ आश्रम येथे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितेश जाधव यांच्या उपस्थितीत फळवाटप कार्यक्रम झाला.
स्नेहभोजन आणि मोफत अन्नसेवा
धाराशिव येथील अन्नपूर्णा ग्रुपच्या वतीने मोफत अन्नसेवेचे आयोजन करण्यात आले. मार्डी (ता. लोहारा) येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात देखील रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
संताजी चालुक्य-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातील भाजप कार्यकर्ते तसेच इतर पक्षांचे स्नेही, मित्रपरिवार यांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने आयोजित सामाजिक उपक्रमांमुळे वाढदिवसाला एक वेगळे सामाजिक स्वरूप प्राप्त झाले.