परंडा: राजकारणात चतुर, पण डिजिटल दुनियेत ‘नवशिक्या’ असलेल्या भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना भामट्याने ‘वन बटन चाळा’ लावून 19,969 रुपयांनी फसवले.
तर झाले असे, की काही दिवसापूर्वी ठाकुर यांच्या मोबाईलवर एक अनोळखी कॉल आला. समोरच्याने अत्यंत विश्वासाने सांगितले की, “तुमच्या बँक खात्यावरून 4,490 रुपये ट्रान्सफर झालेले नाहीत. खात्री करण्यासाठी फक्त ‘एक बटन’ दाबा.” ठाकूर साहेबांनी तो बटन दाबला… आणि झाले ‘राम राम’.
‘एक बटन’ दाबून ठाकूर साहेबांनी समजले, की त्यांच्या बँक खात्यातून 19,969 रुपये ‘हवेत’ उडाले. आणि मग ठाकूर साहेब परंडा पोलिस ठाण्यात धावत आले. पोलिसांनी ‘मोबाईल-फसवणूक-विशेष’ अशा प्रकारांतर्गत 66(डी) माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा नोंदवला.
या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात ठाकूर साहेबांच्या डिजिटल जाणिवेबाबत चर्चेला उधाण आले आहे. एका कार्यकर्त्याने गंमतीत म्हटले की, “नेत्यांची फिंगरप्रिंट वापरून बँक खात्याची सफाई करून टाकली, आणि साहेब म्हणतायत, ‘बटन दाबलं तर काय बिघडलं?'”
आता ठाकुरसाहेबांनी जरी बटन दाबलं असलं, तरी पोलिस मात्र भामट्याला शोधायला दुसरा बटन दाबणार, हे नक्की!