• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, November 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष प्रसाद मुंडे नाराज; सोशल मीडियावर समर्थकांची ‘धोरणात्मक’ पोस्ट व्हायरल!

admin by admin
November 20, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष प्रसाद मुंडे नाराज; सोशल मीडियावर समर्थकांची ‘धोरणात्मक’ पोस्ट व्हायरल!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव:  नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तिकीट वाटपावरून अनेक पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले असून, धाराशिवमध्ये भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष प्रसाद मुंडे हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. प्रभाग क्रमांक १३ ( ब ) मधून त्यांच्या मातोश्रीला उमेदवारी डावलल्याने ही नाराजी ओढवल्याचे बोलले जात आहे.

प्रसाद मुंडे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी पक्षाच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्षपद भूषवले आहे.  नगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी प्रभाग क्रमांक १३ ( ब ) मधून उमेदवारीसाठी पक्षाकडे प्रबळ दावा केला होता. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी त्यांनी प्रामाणिकपणे आणि हिरीरीने काम केले आहे. स्थानिक पातळीवर त्यांचा दांडगा जनसंपर्क असून, प्रभागात त्यांचे भरीव कार्य आहे. असे असतानाही पक्षाने त्यांच्या मातोश्री निशा अनिल मुंडे यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्याने त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत.

सोशल मीडियावर समर्थकांचा एल्गार

प्रसाद मुंडे यांना डावलल्याचे लक्षात येताच, त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर, “तुम्ही बांधाल तेच तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच धोरण…” या आशयाच्या पोस्ट जोरदार व्हायरल होत आहेत. या पोस्टमधून मुंडे यांच्या समर्थकांनी अप्रत्यक्षपणे पक्षश्रेष्ठींना इशारा दिला असून, आता प्रसाद मुंडे जो निर्णय घेतील  तोच अंतिम असेल, असे संकेत दिले आहेत.

पुढची भूमिका काय?

पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आता प्रसाद मुंडे  बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणार की अन्य काही राजकीय भूमिका घेणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या निर्णयावर प्रभाग क्रमांक १३ मधील निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.

 

Previous Post

तुळजापूर : भाजपचा उमेदवार विनोद गंगणे कुख्यात गुन्हेगार…खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे १५ हुन अधिक गुन्हे

Next Post

 धाराशिव पालिकेची निवडणूक: “अर्ज मागे घेण्यासाठी ‘समजूत’ काढायला येऊ नका, अन्यथा तुमचाच अर्ज होईल अपात्र”

Next Post
 धाराशिव पालिकेची निवडणूक: “अर्ज मागे घेण्यासाठी ‘समजूत’ काढायला येऊ नका, अन्यथा तुमचाच अर्ज होईल अपात्र”

 धाराशिव पालिकेची निवडणूक: "अर्ज मागे घेण्यासाठी 'समजूत' काढायला येऊ नका, अन्यथा तुमचाच अर्ज होईल अपात्र"

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप

November 1, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात गुटखाविरोधात पोलिसांची कारवाई; कळंब, ढोकी, मुरुममध्ये ५० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

November 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 31, 2026

Recent Posts

  • उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
  • नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान
  • परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप
  • धाराशिव जिल्ह्यात गुटखाविरोधात पोलिसांची कारवाई; कळंब, ढोकी, मुरुममध्ये ५० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
  • नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!