• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.धीरज पाटील यांचा “गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा” !

admin by admin
October 6, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.धीरज पाटील यांचा “गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा” !
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मिळालेल्या अनपेक्षित यशाने काँग्रेस कार्यकर्त्यांचा कोमातून जागा झालेला ‘पुनर्जन्म’ पाहण्यासारखा होता. टॉनिक पिऊन तरतरीत झालेल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचं सरकार येणार असल्याचा फाजील आत्मविश्वास चढला आहे. पण हा आत्मविश्वास म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आहे, कारण पक्षातल्या गटबाजीत चक्क मॅरेथॉन सुरू झाल्या आहेत.

धाराशिवमध्ये गटबाजीची मेजवानी तर धडाकेबाज सुरू आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांच्यातील चढाओढ आता पॉपकॉर्न हातात घेऊन बघण्याजोगी झाली आहे. चव्हाण साहेबांचे लाडके सुपुत्र सुनील चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘टाटा-बाय-बाय’ करत भाजपची गाडी पकडली होती. त्यांच्यासोबत काही विश्वासू पंटरही घेऊन गेले. आता आश्चर्य म्हणजे हेच पंटर आता पुन्हा काँग्रेसमध्ये परतत आहेत. पण धीरज पाटील यांनी त्यांच्यासाठी “नो एंट्री” बोर्ड लावून, घरात परतलेल्या पंटरांचा काँग्रेसमधील परतवा धुडकावून लावला आहे.

धीरज पाटील यांच्या पत्रकाने पंटरांच्या घरवापसीला ‘लाल सिग्नल’ दिला असला तरी, दत्तू भालेराव यांच्यासाठी मात्र ‘ग्रीन सिग्नल’ दाखवला आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांचे खास कार्यकर्ते, दोन वेळा पराभूत होऊन भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले भालेराव साहेबांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आणि आपली उमेदवारी फिक्स केली!

मधुकरराव चव्हाण यांच्या पंटरच्या घरवापसीला विरोध करणारे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील, मात्र दत्तू भालेराव यांच्या घरवापसीवर चक्क “मूक नायक” झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्या निर्णयावर विरोध करण्याचं धारिष्ट धीरज पाटील यांच्या अंगी नाहीच. एकंदरीत, हे काँग्रेसचं “गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा”चं अगदी साक्षात उदाहरण आहे!

तर मंडळी, या गटबाजीतून कोण विजयी होणार आणि कोणाची राजकीय गणितं उधळणार, हे बघण्यासाठी पुढील काही महिने खरोखरच ‘एंटरटेनमेंट’चे ठरणार आहेत!

Previous Post

कुत्रा ते डॉबरमॅन : भू – भू !

Next Post

तुळजापुरात “फ्लेक्ससम्राट” अशोक जगदाळेंचा धिंगाणा !

Next Post
तुळजापुरात “फ्लेक्ससम्राट” अशोक जगदाळेंचा धिंगाणा !

तुळजापुरात "फ्लेक्ससम्राट" अशोक जगदाळेंचा धिंगाणा !

ताज्या बातम्या

तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!

तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!

September 29, 2026
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

September 29, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?

September 29, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या

September 28, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

September 27, 2026

Recent Posts

  • तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!
  • भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका
  • ‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?
  • धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या
  • धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!