धाराशिव: शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय परिसर हा तब्बल 17 एकर आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जुनी आणि औषधी झाडे होती. मात्र, डीन गंगासागरे यांनी बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून ती लाकडे व्यापाऱ्यांना विकल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. धाराशिव लाइव्हकडे या गैरकारभाराचे ठोस पुरावे हाती लागले असून, एका ट्रक मधून लाकडे जात असल्याचे फोटोही मिळाले आहेत.
बेकायदेशीर वृक्षतोड – कोणतीही परवानगी नाही!
गंगासागरे यांनी या झाडांची तोड करताना ना वनविभागाची परवानगी घेतली, ना कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली. पूर्णपणे बेकायदेशीरपणे ही वृक्षतोड करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात लाकडे चोरून विकली गेली.
व्यापाऱ्यांसोबत लाकडांचा गुप्त व्यवहार, पैसे खिशात!
यातील सर्व लाकडे स्थानिक व्यापाऱ्यांना विकण्यात आली असून, यामधून मिळालेला संपूर्ण पैसा गंगासागरे यांनी खिशात घातल्याचा आरोप होत आहे. म्हणजेच, शासकीय मालमत्ता लुटून ती खासगी लोकांना विकण्याचा हा सरळसरळ मोठा घोटाळा आहे.
लाकडांनी भरलेला ट्रक – फोटो पुरावा हाती!
धाराशिव लाइव्हच्या हाती या वृक्षतोडीचे ठोस पुरावे लागले आहेत. एका ट्रकमधून लाकडे बाहेर पाठवतानाचे फोटो मिळाले असून, या व्यवहारामागे मोठा गैरव्यवहार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पर्यावरणाचा मोठा ऱ्हास – सरकार करणार काय?
धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालयाचा हा 17 एकरचा परिसर निसर्गसंपन्न होता. ही झाडे कापल्याने केवळ आर्थिक भ्रष्टाचारच नाही, तर पर्यावरणाचा मोठा ऱ्हासही झाला आहे.
गंगासागरे यांच्यावर कारवाई होणार का?
इतक्या मोठ्या घोटाळ्यावर आता प्रशासन आणि शासन काय भूमिका घेणार? गंगासागरे यांच्यावर तातडीने कारवाई होणार का, की हा प्रकारही दडपला जाणार?
👉 धाराशिव लाइव्ह याप्रकरणात आणखी खुलासे करत राहील. सत्य बाहेर आणण्यासाठी प्रशासनाची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!