नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. आजवर काही दलालांनी लोकांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये खोटी माहिती पसरवली होती. पण ‘धाराशिव लाइव्ह’ने सत्य समोर आणले आणि लोकांना खरी परिस्थिती समजली.
दलालांचा फसवा डाव फसला!
उमरग्याचा दलाल आणि नळदुर्गचा कैंवारी यांची खोटी नाटकी आंदोलने, न्यायालयीन खेळी आणि अफवा पसरवण्याचे प्रयत्न उघडे पडले. या कारस्थानामुळेच चार पदरी राष्ट्रीय महामार्ग रद्द झाला आणि केवळ १२ मीटरच्या जुन्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे.
मुरूम-अक्कलकोट रस्त्यावरही तीच दलाली!
नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याला जसा उमरग्याच्या दलालाने विरोध केला, तसाच विरोध काही दलालानी मुरूम-अक्कलकोट रस्त्यासाठी सुरू केला आहे. मुरूम-अक्कलकोट रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, पण आलूर ते बोळेगाव,कुन्सावळी ते बोळेगाव दरम्यानचा एक ते दीड किलोमीटरचा भाग अडवला जात आहे.
अति झाले पण ह्यांची लाज नाही!
- जुना रस्ताही डांबरीकरण करू दिला जात नाही!
- रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या वाहनांवर दगडफेक केली जात आहे!
- अडथळे निर्माण करून विकास रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे!
हा सरळसरळ विकासविरोधी आणि गुन्हेगारी मानसिकतेचा प्रकार आहे. लोकांच्या सोयीपेक्षा या दलालांना त्यांच्या स्वार्थाचे आणि दलालीचे जास्त टेंशन आहे.
आता यांना तडीपार करायलाच हवे!
या प्रकाराला आता वेळीच आळा बसला पाहिजे. यापुढे जर कोणी विकासकामांमध्ये अडथळा आणला, तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने या समाजकंटकांना तडीपार करण्याची कारवाई त्वरित करावी!
धाराशिव लाइव्हचा स्पष्ट इशारा – विकास रोखणाऱ्यांना जुमानणार नाही!
रस्ते, पूल, महामार्ग हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी असतात, कोणाच्या खाजगी दलालीसाठी नव्हेत! प्रशासनाने त्वरित पावले उचलून ही दहशत आणि गुंडगिरी थांबवावी! रस्त्यांवर रोखठोक विकास व्हायलाच हवा, नाहीतर जनता आता थेट रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही!