• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘गद्दार’ बॅनरची ‘इन्साईड स्टोरी’ उघड! पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजप नेत्याचीच करामत; शिंदे गटाचाही सणसणीत पलटवार

admin by admin
August 27, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये राजकारण तापले!  पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हणतात, पण स्थानिक पातळीवरची खुन्नस आणि पराभवाची खदखद किती भयंकर असू शकते, याचा एक उत्तम नमुना धाराशिवमध्ये पाहायला मिळाला आहे. शहरात लागलेले ‘एक कोटीचा गद्दार’ आणि ‘दाढीवाला बोका’ असे उल्लेख असलेले ते वादग्रस्त बॅनर कोणी कट्टर शिवसैनिकाने लावले नसून, चक्क भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने लावले असल्याची ‘इन्साईड स्टोरी’ आता समोर आली आहे.

पराभवाचा राग आणि रात्रीतून ‘बॅनर-बॉम्ब’

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, समतानगरमधील हे होर्डिंग शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले नगरसेवक नाना घाडगे यांना टार्गेट करून लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्या भाजप पदाधिकाऱ्याने हे बॅनर लावले आहे, त्याला सहा महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत याच नाना घाडगे यांनी आस्मान दाखवत पराभूत केले होते. निवडणुकीत खावी लागलेली तीच धूळ आणि पराभवाचा तोच राग मनात ठेवून, या पदाधिकाऱ्याने ठाकरे गटाच्या नावाखाली आपली वैयक्तिक भडास या होर्डिंगच्या माध्यमातून काढली आहे.

“तुमच्याकडे आले की खुद्दार, आमच्याकडे आले की गद्दार?”

हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मित्रपक्ष असलेल्या भाजपच्याच पदाधिकाऱ्याने असा ‘गेम’ केल्याने शिंदे गटाने थेट भाजपलाच आरसा दाखवला आहे. “वा रे तुमचा न्याय! एखादा नेता तुमच्या पक्षात (भाजपमध्ये) आला, वाशिंग मशीनमध्ये धुतला गेला की तो एकदम ‘खुद्दार’ आणि निष्ठावान होतो. पण तोच नेता जर शिवसेनेच्या शिंदे गटात आला, तर रातोरात ‘गद्दार’ कसा काय ठरतो?” असा बोचरा सवाल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे.

कळंबचे १० नगरसेवक फोडताना किती ‘खोके’ मोजले?

शिंदे गटाचा संताप एवढ्यावरच थांबलेला नाही. ‘१ खोका, मतदाराला धोका’ या आरोपाचा समाचार घेताना त्यांनी थेट भाजपच्या वर्मावरच बोट ठेवले आहे. शिंदे गटाने सवाल केला आहे की, “आम्हाला खोक्यांवरून हिणवताय, मग कळंब नगरपरिषदेमधील तब्बल दहा (१०) नगरसेवक जेव्हा भाजपने फोडले होते, तेव्हा त्यांना किती खोके मोजले होते? तिथे काय सगळा व्यवहार फुकटात झाला होता का? तो कोणता प्रामाणिकपणा होता?”

थोडक्यात काय… एकंदरीतच, धाराशिवच्या राजकारणात सध्या ‘बॅनर एकाचे, राग दुसऱ्याचा आणि बदनामी तिसऱ्याचीच’ असा भन्नाट खेळ रंगला आहे. वैयक्तिक आकसापोटी लावलेल्या या बॅनरमुळे आता स्थानिक पातळीवर महायुतीतच ठिणगी पडली असून, आगामी काळात या ‘बॅनर-बदला’ नाट्याचा अंक कसा पुढे जातो, हे पाहणे रंजक ठरणार आहे!

Previous Post

धाराशिव नगरपालिकेतील पक्षांतरावर ठाकरे गट आक्रमक; चारही नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात जाणार

Next Post

‘दाढीवाला बोका’ १ खोक्याला विकला! ‘ऑपरेशन लोटस’ विरुद्ध ‘टायगर’मध्ये गटनेत्याचाच मोठा ‘गेम’!

Next Post
ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

'दाढीवाला बोका' १ खोक्याला विकला! 'ऑपरेशन लोटस' विरुद्ध 'टायगर'मध्ये गटनेत्याचाच मोठा 'गेम'!

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!